Jasprit Bumrah News l बुम बुम बुमराहने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

Jasprit Bumrah News l भारतीय क्रिकेटसाठी आजच दिवस ऐतिहासिक ठरला आहे. याचे कारण ठरला आहे तो म्हणजे टीमइंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह. कारण बुमराहने आजच्यादिवशी अनेक रेकॉर्ड आपल्या नवे करून घेतले आहेत. त्यामध्ये प्रामख्याने बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. (Jasprit Bumrah)

Jasprit Bumrah News l बुमराह ICC च्या क्रमवारीत 881 गुणांसह अव्वल स्थानी :

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अशी जसप्रीत बुमराहची ओळख आहे. इंग्लंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. तो सध्या ICC च्या क्रमवारीत 881 गुणांसह अव्वल स्थानीं आहे. एवढेच नव्हे तर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याचा सहकारी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मागे टाकले आहे. नवीन ताज्या कसोटी क्रमवारी हातीआल्यानुसार आर अश्विन आता 841 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने 851 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

एवढेच नव्हे तर जसप्रीत बुमराह क्रिकेट इतिहासातला असा एकमेव गोलंदाज आहे जो तीनही फॉर्मेटमध्ये नंबर एकाचं गोलंदाज आहे. याआधी वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये बुमराह एक नंबरवर होता. आता बुमराह टेस्ट क्रिकेटमध्येही अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

 Jasprit Bumrah News l बुमराहचं दुखापतीनंतर जोरदार कमबॅक :

जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे मागील काही महिन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. परंतु त्यांने आता जोरदार कमबॅक केले असून 2022 मध्ये सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो साधारण वर्षभर क्रिकेटपासून दूर होता यादरम्यान बुमराहवर शस्त्रक्रिया झाली असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर आले होते.

Jasprit Bumrah News l त्यानंतर बुमराहने टी 20 क्रिकेटमधून सर्वात आधी कमबॅक केला. व हळू हळू वनडे आणि आता कसोटीमध्ये कमबॅक केला आहे. यंदाच्या वर्षात बुमराहने फक्त चार कसोटी सामने खेळत जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय स्टार जसप्रीत बुमराहने फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवरही इंग्लडविरुद्ध विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, आणखी एका कामगिरीबाबत बोलायचे झाले तर बुमराहने कसोटी कारकिर्दीत 8 व्यांदा एकाच कसोटीत पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि भारतात सामना खेळत असताना त्याने पहिल्यांदाच ही कामगिरी केली आहे.

News Title : Jasprit Bumrah News

महत्वाच्या बातम्या – 

Share Market Tips l शेअर मार्केट कोसळण्याची नेमकी कारणे कोणती? मार्केटने ‘हे’ संकेत दिसल्यास वेळीस व्हा सावध

Poonam Pandey l अभिनेत्री पूनम पांडे संदर्भात मोठी बातमी समोर! सरकारने दिला नकार

NCP Political Crisis l शरद पवार गट यापैकी एका पक्ष नावाची आणि चिन्हाची निवड करणार

Penalty on Tobacco Product Makers l नागरिकांनो…पान-मसाला आणि तंबाखूबाबत बदलले नियम! वाचा सविस्तर

Rohit sharma Catch l वयाच्या 36 व्या वर्षी हिटमॅनची एवढी दमदार फिल्डिंग की पुन्हा पुन्हा पाहतच राहावा वाटते! पाहा व्हिडिओ