पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याचे हे आहेत सोपे मार्ग; बँकांपेक्षा मिळेल जास्त व्याजदर

Post Office Scheme l जर तुम्ही नोकरी करून अथवा व्यवसाय करून रोजच्या रोज चांगले पैसे कमवत असाल व जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचे चांगले मार्ग शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पोस्टाच्या अशाच एका खात्याबाबत अगदी थोडक्यात माहिती. जेथे तुम्ही पैसे गुंतवणूक करून बँकेपेक्षा चांगले व अधिक व्याजदर मिळवू शकता. (Post Office Scheme)

आम्ही तुम्हाला आजच्या लेखात पोस्टाच्या बचत खात्याचे फायदे, अकाउंट उघडण्याची प्रोसेस, खाते उघडल्यास कोण-कोणत्या सुविधा मिळणार, तसेच पोस्ट ऑफिसच्या काही खास योजनेबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत. (Post Office Scheme)

Post Office Scheme l बचत खात्याच्या खास सुविधा :

पोस्ट ऑफिस खात्याबाबत बोलायचे झाले तर यामध्ये बँकांसारखे सेविंग अकाउंट असते. हे सेविंग्स अकाउंट बँकेच्या सेविंग्स अकाउंट सारखं असतं. यात आपल्याला ATM आणि चेकबुकची सुविधा प्रामुख्याने मिळते. तसेच पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाउंटमध्ये 10 हजार रुपये पर्यंत व्याजवर आपल्याला कोणत्याही प्रकारचे टॅक्स देण्याची गरज नसते.

तसेच पोस्ट ऑफिसच्या दोन महत्त्वाच्या सुविधांबाबत बोलायचे झाले तर एक म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट आणि पोस्ट ऑफिस टर्म डिपॉजिट या अत्यंत लोकप्रिय योजनांमध्ये गुंतवणुकीचे चांगले मार्ग असल्याचे सांगण्यात येते.

Post Office Scheme l पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याची सोपी पद्धत :

– तुम्हाला बचत खाते हवे असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे अकाउंट उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल.

– या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर अशी माहिती विचारली जाईल. तर पुढे विचारण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. (Post Office Scheme)

– फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रूफ टाकावा लागेल. किंवा तुम्हाला तुम्ही वीज बिल किंवा रेशन कार्ड इत्यादी जोडावे लागू शकते.

– यानंतर हा भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा. यासोबत तुमचे बचत खाते लवकरच उघडले जाईल.

पोस्ट ऑफिसच्या काही खास योजना :

पोस्ट ऑफिस अनेक लहान लहान बचत योजना ऑफर करते. यामध्ये पोस्ट ऑफिस बँकेंच्या अपेक्षा पेक्षा अधिक व्याज दर ग्राहकांना ऑफर करत असते. यामध्ये प्रामुख्याने पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट, पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धि योजना (SSY), नेशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC), 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट, किसान विकास पत्र (KVP) और सीनियर सिटीजन सेविंग्स याव्यतिरिक्त अनेक योजना असल्याचे सांगण्यात येते.

News Title : Post Office Scheme

महत्वाच्या बातम्या – 

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! नशीब चमकणार; या 3 राशींच्या धनात होणार वाढ

Jasprit Bumrah News l बुम बुम बुमराहने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

Share Market Tips l शेअर मार्केट कोसळण्याची नेमकी कारणे कोणती? मार्केटने ‘हे’ संकेत दिसल्यास वेळीस व्हा सावध

Poonam Pandey l अभिनेत्री पूनम पांडे संदर्भात मोठी बातमी समोर! सरकारने दिला नकार

NCP Political Crisis l शरद पवार गट यापैकी एका पक्ष नावाची आणि चिन्हाची निवड करणार