Bailgada Sharyat | महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत प्रचंड अत्यंत लोकप्रिय आहे. प्रत्येक तालुका-गाव पातळीवर अशा बैलगाडा शर्यतीच नियोजन वारंवार केलं जात. आजकाल ग्रामीण भागासह शरि भागातील युवा पिढीला देखील बैलगाडा शर्यतीची क्रेझ चांगलीच आहे. बैलगाडा शर्यतीत कित्येक मोठं मोठे बक्षीस दिले जातात. अशातच आता राजकीय क्षेत्रातील पुढारी मंडळी देखील जिल्हा पातळीवर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत असतात.
या बैलगाडा शर्यतीत मोठया रकमेची पारितोषिक देखील दिली जातात. या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेते जनमानसात आपली ओळख निर्माणव्हावी म्हणून या गोष्टी करत असतात. तसेच बैलगाडा शर्यतीतून बैलगाडा मालकांना देखील मोठी बक्षिसे दिले जातात. याशिवाय या स्पर्धेमुळे प्रेक्षकांच देखील मनोरंजन होतं असत. याच कारणामुळे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जिल्हाभरातून जेष्ठ नागरिकांसह तरुण पिढी मोठ्या संख्येने येत असतात. (Jayant Kesri Bailgada Sharyat)
Bailgada Sharyat | विजेत्यास चक्क 1 BHK फ्लॅट बक्षीस मिळणार :
सहसा बैलगाडा शर्यतीमध्ये विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आल्याचे आपण पहिले आहे. मात्र आता बैलगाडा शर्यतीतील विजेत्याला एक खुशखबर आहे. सांगलीच्या कासेगावमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या बैलगाडा शर्यतीला जयंत केसरी असं नाव देण्यात आलं आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे या बैलगाडा शर्यतीमधील विजेत्यास चक्क 1 BHK फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जयंत केसरी बैलगाडी स्पर्धा चर्चेचा विषयच बनला आहे. (Jayant Kesri Bailgada Sharyat)
Bailgada Sharyat | दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास किती लाख मिळणार?
मात्र आता सर्वांचा प्रश्न पडला असेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे शरद लाहीगडे फाउंडेशनकडून 17 फेब्रुवारी 2024 ला बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या बैलगाडी शर्यतीतून पहिला क्रमांक पटकावणाऱ्याला 1 BHK फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी स्पर्धकाला 7 आणि 5 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या जयंत केसरी (Jayant Kesri Bailgada Sharyat) ही स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातून 200 हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर या स्पर्धेसाठी तब्बल 10 एकरावर मैदान तयार करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा स्पर्धकांना उत्सुकता लागली आहे.
News Title : Jayant Kesri Bailgada Sharyat
महत्वाच्या बातम्या –
आता तुमच्या व्यवसायाला मिळणार व्हॉट्सॲपची साथ! होणार फायदाच फायदा
आजचे राशिभविष्य! या राशीवर होणार बुध ग्रहाचा प्रकोप ;जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागणार
या दिवशी होणार भारत विरुद्ध इंग्लंड सामना! पाहा राजकोटमध्ये टीम इंडियाची कामगिरी नेमकी कशी
…यापुढे शिक्षक होणे सोपे नाही! शिक्षण विभागाने घेतला हा मोठा निर्णय
बापरे! या कंपनीच्या इलेक्ट्रिक कार 1.20 लाख रुपयांनी झाल्या स्वस्त