ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!

सांगली | कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

कवठे महंकाळ नगरपंचायतीची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. सामान्य लोकांच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मी आभार मानत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

आज आबांची खूप आठवण येते. कवठे महंकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असावी हे आबांचे स्वप्न होते. त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं असल्याचं रोहित पाटील यावेळी म्हणाले आहेत.

या निवडणुकीत काही प्रसंग असे होते, की आम्हाला अनेकदा प्रचार करु दिला नव्हता. संघर्ष पेटला होता. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. या निवडणुकीत झालेला विजय हा कवठेमहाकाळमधील लोकांचा विजय आहे, असं रोहित पाटील यांनी म्हटलंय.

लोकांच्या प्रश्नांवरच आम्ही लढलो. सातत्यानं आम्ही लोकांमध्येच राहिलो होतो. लोकांच्या प्रश्नांचं आम्ही निरसन करत गेलो, त्यामुळे लोकं आमच्या पाठीशी उभी राहिली. कवळेमहाकाळ शहरात निवडणूक लढवत असताना आपलं शहर कसं असलं पाहिजे आणि आजपासून पुढच्या वीस-तीस वर्षात शहर कसं डेव्हलप झालं पाहिजे, याचं व्हिजन आम्ही ठेवलंय. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर व्यक्त केलाय.

70 ते 75 वर्षानपासून इथे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचं यावेळी पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता 

वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

“मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं