केंद्र सरकारने महिलांना दिली खास भेट! गॅस सिलिंडर तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी केला स्वस्त

LPG Gas Cylinder Price l आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील माता भगिनींना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांनी स्वस्त केला असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना घरगुती बजेटमधून थोडासा दिलासा मिळणार आहे.

LPG Gas Cylinder Price l पीएम मोदींनी ट्विट करत दिली माहिती :

यासंदर्भात पीएम मोदींनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट मध्ये असे म्हणाले की, ‘आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद सरकारच्या या घोषनेमुळे महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार आहे. याशिवाय देशातील करोडो कुटुंबांचा आर्थिक भार देखील कमी होईल. केंद्र सरकारचे हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. तसेच यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल.

तसेच आमचे उद्दिष्ट कुटुंबांच्या कल्याणासाठी कार्य करत राहणे आहे. यासह आम्ही निरोगी वातावरण सुनिश्चित करू इच्छितो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी आमची बांधिलकी दर्शवते.

देशभरात 14.17 कोटी मोफत LPG सिलिंडर प्रदान :

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी केल्याने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशभरात 14.17 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर दिले असल्याची माहिती आहे. याशिवाय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.

LPG Gas Cylinder Price l आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केले अभिनंदन! :

पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले की, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! आम्ही महिला शक्तीच्या सामर्थ्याला आणि धैर्याला सलाम करतो आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करतो. आमचे उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान, सरकार शिक्षण आणि इतर क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरून हे स्पष्टपणे दिसून येते.

News Title : LPG Gas Cylinder Price

महत्त्वाच्या बातम्या-

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींवर भोलेनाथ प्रसन्न होणार; मिळणार आनंदाची बातमी

आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम

PM मुद्रा योजनेद्वारे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता; असा करा अर्ज

यंदा महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त

महिला दिनानिमित्त जाणून घ्या भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला अन् त्यांची संपत्ती