आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींवर भोलेनाथ प्रसन्न होणार; मिळणार आनंदाची बातमी

Today Horoscope l मेष:- प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. शुभ रंग जांभळा शुभ अंक ८

वृषभ:- लहान प्रवास संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल. शुभ रंग हिरवा शुभ अंक २

मिथुन:- प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ञ व्यक्तींची भेट होईल. शुभ रंग लाल शुभ अंक ६

कर्क:- आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे. शुभ रंग पिवळा शुभ अंक १

सिंह:- कामातील समस्या दूर कराव्या लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत. शंकर भोलेनाथ प्रसन्न होतील. शुभ रंग विटकरी शुभ अंक ९

Today Horoscope l कन्या:- विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. शुभ रंग नारंगी शुभ अंक ६

तूळ:- धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील. शुभ रंग जांभळा शुभ अंक २

वृश्चिक:- व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा. शुभ रंग काळा शुभ अंक ७

धनू:- स्पर्धेत यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा. शुभ रंग निळा शुभ अंक १

मकर:- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका. शुभ रंग लाल शुभ अंक ३

कुंभ:- मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील. शुभ रंग निळा शुभ अंक ८

Today Horoscope l मीन:- गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. शुभ रंग पोपटी शुभ अंक ५

महत्त्वाच्या बातम्या-

आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम

PM मुद्रा योजनेद्वारे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता; असा करा अर्ज

यंदा महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त

महिला दिनानिमित्त जाणून घ्या भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला अन् त्यांची संपत्ती

महिला दिनानिमित्त अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार हा चित्रपट!