आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम

Women’s Day 2024 l उद्या 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी या उद्देशाने महिला दिन साजरा केला जातो. त्यामुळे महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते, पण तुम्हाला माहिती आहे का? 8 मार्च हा दिवस महिला दिनासाठी का निवडला गेला? आज आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊयात…

Women’s Day 2024 l आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? :

महिला दिन साजरा करण्यासाठी 8 मार्च निवडण्यामागे एक खास कारण आहे. खरं तर अमेरिकेत काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी 8 मार्च रोजी आंदोलन सुरू केले होते. अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील कामगारांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला. या रशियन महिलांनी महिला दिवस साजरा करून पहिल्या महायुद्धाचा निषेध केला. 1917 मध्ये रुखच्या महिलांनी रोटी आणि शांततेसाठी संप केला होता. तसेच युरोपमधील महिलांनी 8 मार्च रोजी शांतता कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी रॅली काढल्या होत्या. या कारणास्तव 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. नंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली.

Women’s Day 2024 Theme l महिला दिन 2024 ची थीम काय आहे? :

दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका थीमसह साजरा केला जाते. 2024 मध्ये हा दिवस Inspire Inclusion (एक असे जग जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळतो) या थीमसह साजरा केला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व काय आहे? :

आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की महिलांना पुरुषांइतकाच सन्मान मिळावा आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी. तसेच महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजातील असमानता दूर करण्यासाठी या दिवसाचे खूप महत्त्व आहे.

News Title : Why is International Women’s Day celebrated on March 8

महत्त्वाच्या बातम्या-

PM मुद्रा योजनेद्वारे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता; असा करा अर्ज

यंदा महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त

महिला दिनानिमित्त जाणून घ्या भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला अन् त्यांची संपत्ती

महिला दिनानिमित्त अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार हा चित्रपट!

ना बॅटरी, ना पेट्रोल खर्च, कारमध्ये बसवा Mini Solar AC