Manoj Jarange Mumbai March l सध्या मराठा आरक्षण मोर्चाचा विषय चांगलाच गाजलेला दिसत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चाला सुरवात केली आहे. या मोर्चाला मराठा समाज देखील (Manoj Jarange Mumbai March) चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. आज हा मोर्चा चंदननगर (खराडी बायपास) पुणे येथे असणार आहे. तर उद्या म्हणजेचं 24 जानेवारीला हा मोर्चा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोहोचणार आहे.
मात्र यादरम्यान एक महत्वाची अपडेट्स आहे. उद्या 24 जानेवारीला सकाळी 6 वाजल्यापासून मोर्चाला सर्वात होणार आहे. हा मोर्चा पुणे ग्रामीण भागात येईपर्यंत सर्व वाहनांची वाहतूक काहीवेळासाठी बंद राहणार आहे. याशिवाय पर्यायी मार्गावरील वाहनचालकांना मार्गदर्शन करून ही वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (Manoj Jarange Mumbai March)
Manoj Jarange Mumbai March l असा असणार वाहतुकीचा बदल :
औंध डीमार्ट ते सांगवी फाटा : या दरम्यानच्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी तात्पुरती बंदी असणार आहे. तसेच या मार्गावरील वाहनांनी पोल चौकातून डावीकडे वळून नागराज रोडमार्गे आपल्या इच्छुक स्थळी जावे.
पिंपळे निलख ते रक्षक चौक : या मार्गावरील म्हणजेच पिंपळे निलख येथून येणाऱ्या वाहनांनी रक्षक चौकात न जाता थेट विशाल नगर डीपी रोडमार्गे जगताप चौक – कस्पटे चौक मार्गाने इच्छुक स्थळी जावे.
जगताप डेअरी पुलाखालचा चौक : या मोर्चा दरम्यान कसपटे चौकातील वाहने जगताप डेअरी चौकाखालील ग्रेड सेपरेटरद्वारे शिवार चौक, कोकणे चौक येथून थेट इच्छुक स्थळी जावे. यावेळी औंध रावेत रोडने डाव्या व उजव्या बाजूने जाणे टाळावे.
शिवार चौक वाहतूक : शिवार चौकातून वाहतूक थेट कस्पटे चौकातून ग्रेड सेपरेटरमधून मार्गस्थ व्हावे.
तापकीर चौक, एमएम चौक ते काळेवाडी फाटा पूल : या ठिकाणादरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. तसेच या मार्गावरील वाहनांनी रहाटणी फाटा चौकातून रहाटणी गाव – गोडांबे चौकमार्गे आपल्या इच्छुक स्थळी जावे.
सांगवी ते सांगवी फाटा : सांगवी ते सांगवी फाटा या मार्गावरील वाहनांनी शितोळे पंप – जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा चौक – जुनी सांगवी – दापोडी मार्गे आपल्या इच्छुक स्थळी जावे.
News Title : Manoj Jarange Mumbai March
महत्वाच्या बातम्या :
WPL 2024 l किक्रेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर
Pradhan Mantri Suryoday Yojana l या योजनेचा लाभ घ्या अन् वीज बिलापासून सुटका मिळवा!
Ram Mandir Darshan l आजपासून राम मंदिरात घेता येणार दर्शन! तीनदा होणार आरती, ही आहे वेळ
Virat Kohli l विराटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी?…म्हणून विराट कोहली टीम इंडियाची साथ सोडणार