Pradhan Mantri Suryoday Yojana l या योजनेचा लाभ घ्या अन् वीज बिलापासून सुटका मिळवा!

Pradhan Mantri Suryoday Yojana l केंद्र सरकारकडून देशातील जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा (Pradhan Mantri Suryoday Yojana) केली आहे.

देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवणार! :

या योजने अंतर्गत देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदींनी यासंदर्भातील एका बैठकीचे अध्यक्षपदही घेतले आहे. राममंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरु केली आहे. मात्र या योजेनचा लाभ कोणाला मिळणार आणि त्याचे नियम काय आहेत याबाबद्दलची माहिती आज आपण जाणून घेऊयात…

पीएम मोदींनी दिली याबद्दलची माहिती :

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारतीयांच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. अयोध्येहून परतल्यानंतर हा मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही तर ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल असे पीएम मोदी म्हणाले आहेत. (Pradhan Mantri Suryoday Yojana)

Pradhan Mantri Suryoday Yojana l योजनेचे लाभ कोणाला मिळणार? :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केली आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. तसेच सध्या याबाबत सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नसून, ज्या कुटुंबांचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या एक कोटी लोकांना या योजनेत आणले जाणार आहे. सोलर पॅनल बसवल्यानंतर वीजबिलाच्या ताणातून नागरिकांची सुटका होणार आहे. ज्या राज्यांमध्ये वीज खूप महाग आहे तेथील लोकांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होणार आहे. सर्वात महत्वाचं शेतकरी वर्गाला या योजनेचा सर्वात जास्त लाभ होणार आहे.

News Title : Pradhan Mantri Suryoday Yojana

महत्वाच्या बातम्या :

Ram Mandir Darshan l आजपासून राम मंदिरात घेता येणार दर्शन! तीनदा होणार आरती, ही आहे वेळ

Virat Kohli l विराटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी?…म्हणून विराट कोहली टीम इंडियाची साथ सोडणार

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे जुने आर्थिक व्यवहार मार्गी लागणार

Winter Health Tips l हिवाळ्यात हात-पाय सुजत असतील तर हे घरगुती उपाय करा

Ram Mandir l राम भक्तांनो हे आहेत देशातील सर्वात मोठी 5 राम मंदिरं