Virat Kohli l भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 सामना 17 जानेवारीला पार पडला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाने बाजी मारली आहे. अशातच आता क्रिकेटप्रेमी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता क्रिकेट चात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका 5 सामन्यांची होणार आहे.
Virat Kohli l विराटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! :
भारत विरुद्ध इंग्लड ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. मात्र अशातच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या चात्यांसाठी एक वाईट बातमी आहे. विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले आहे.
IND Vs ENG l यासंदर्भात BCCI ने देखील माहिती दिली आहे. विराट याने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतल्यामुळे टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसा असेल यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर विराट कोहलीच्या जागी कोण येणार याबाबत सर्वात मोठे प्रश्नचिन्ह आहे. बीसीसीआयने अद्याप पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी संघाची घोषणा केलेली नाही.
विराटच्या जागी केएल राहुल खेळण्याची शक्यता :
अशातच आता प्लेइंग 11 मध्ये विराटच्या जागी केएल राहुल खेळण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केएल राहुलने मधल्या फळीत फलंदाजी करताना शानदार शतक झळकावले. मात्र, केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. पण भारतातील टर्निंग ट्रॅकमुळे राहुल फक्त बॅट्समन म्हणून खेळताना दिसणार आहे. यामुळे यावेळी राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे दिली जाऊ शकते. घरच्या खेळपट्ट्यांवर अय्यरचा विक्रम अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. अय्यर गेल्या दोन वर्षांपासून कसोटी सेटअपचा एक भाग आहे आणि निवडकर्ते त्याच्याकडे भविष्यातील स्टार म्हणून पाहत आहेत. (IND Vs ENG)
Virat Kohli l अशा स्थितीत श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाईल. पूर्वीप्रमाणेच शुभमन गिल अजूनही तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे, तर सलामीची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्याकडे असेल.
अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
News Title : Virat Kohli will not play the Test series
महत्वाच्या बातम्या :
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे जुने आर्थिक व्यवहार मार्गी लागणार
Winter Health Tips l हिवाळ्यात हात-पाय सुजत असतील तर हे घरगुती उपाय करा
Ram Mandir l राम भक्तांनो हे आहेत देशातील सर्वात मोठी 5 राम मंदिरं
LIC Jeevan Dhara 2 l आयुष्यभर परताव्याची हमी मिळणार! LIC ची नवीन योजना लाँच
Kia Seltos l Kia कंपनीने लाँच केले Seltos चे 5 जबरदस्त मॉडेल! जाणून घ्या फीचर्स