हर हर महादेव..! भारतातील या शहरांमध्ये मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी करा

Mahashivratri 2024 l महाशिवरात्री हा हिंदूंचा विशेष सण आहे. हा सण माघ महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या पवित्र दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2024) भोलेनाथांचे भक्त देशभरातील मंदिरांमध्ये जाऊन शंकराची पूजा आणि अभिषेक करतात. या दिवशी तुम्ही भारतातील अशा काही मंदिरांना भेट देऊ शकता जिथे तुम्ही महाशिवरात्री उत्सवात साजरा करू शकता.

1.हरिद्वार :

Mahashivratri 2024 l हरिद्वारमध्ये अनेक मोठे घाट आहेत, हर की पौरी घाट हा येथील सर्वात प्रसिद्ध घाट आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शिवभक्त नीलकंठ मंदिरात दर्शनासाठी जमतात. येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. हरिद्वार हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर येथे तुम्ही मंदिरात गेल्यावर तुमच्या मित्रांसोबत रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.

2.गुवाहाटी :

गुवाहाटीचे उमानंद मंदिर महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथे हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. हे मंदिर ब्रह्मपुत्रा नदीच्या मोर बेटावर आहे. गुवाहाटीच्या या प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक आणि भाविक देशभरातून येतात. येथे महाशिवरात्रीचा उत्सव दोन ते तीन दिवस साजरा केला जातो.

3.उज्जैन :

Mahashivratri 2024 l मध्यप्रदेशातील उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर 12 जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंगांमधील एक आहे. हे मंदिर शिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे उत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेमध्ये असे मानले जाते की दुषण नावाचा राक्षस अवंतीमध्ये राहणाऱ्या लोकांवर अत्याचार करत असे. तिथल्या लोकांना राक्षसाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी भोलेनाथांनी भूमीतून प्रकट होऊन त्या राक्षसाचा नाश केला होता. यानंतर अवंतीच्या लोकांच्या इच्छेनुसार महादेवाने उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात कायमस्वरूपी निवास केला.

4. जुनागड :

महाशिवरात्रीनिमित्त भारतभरातून हजारो भाविक जुनागडच्या या मंदिरात दर्शनासाठी येतात. महादेवाच्या भक्तांव्यतिरिक्त गीर जंगल आणि भवनाथ तेलाटी येथे राहणाऱ्या साधूंचीही गर्दी असते. या ठिकाणची जत्रा ही शिवरात्रीच्या पाच दिवस आधी सुरू होते आणि शिवरात्रीच्या दिवशी संपते.

5. सोमनाथ मंदिर, गुजरात :

गुजरात येथील सोमनाथ मंदिर हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हे मंदिर एलईडी दिव्यांनी सजवले जाते. सोमनाथ मंदिराचे पुजारी दररोज शिवलिंगाला दूध, दही, मध, साखर, तूप आणि पाण्याने अभिषेक करतात.

News Title : Mahadev Temple In India Mahashivratri 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचं तिकीट फायनलचं? कोण आहेत मुरलीधर मोहोळ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आज या वेळेत धावणार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी तब्बेतीची काळजी घ्यावी

‘मी कोणालाही त्रास देत नाही, आधी त्यांनी…’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

“छात्या दुखल्या तरी पण…”; जरांगेंच्या वक्तव्याने एकच खळबळ