विदर्भ आणि मुंबई यांच्यात होणार रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना! कोण वरचढ ठरणार

Ranji Trophy 2024 Final Match l क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रणजी ट्रॉफी 2024 चे फायनल संघ अखेर समोर आले आहेत. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईचा सामना विदर्भाशी होणार आहे. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना 10 मार्चपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. मुंबई संघाने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा पराभव करून अंतिम फेरीत आधीच स्थान पक्के केले होते. मात्र शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत मुंबईचा सामना करण्याचा परवाना मिळवला आहे.

विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना हा रणजी ट्रॉफी 2024 चा पहिला उपांत्य सामना होता. या सामन्यात विदर्भाने मध्यप्रदेशला विजयासाठी 321 धावांचे टार्गेट दिले होते. प्रत्युत्तरात मध्यप्रदेश संघ केवळ 258 धावा करू शकला आणि सामना गमावला. मध्य प्रदेशच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यश दुबेने दुसऱ्या डावात सर्वाधिक 94 धावा केल्या तर यश राठोड विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. यश राठोडने सहाव्या क्रमांकावर असलेल्या आपल्या संघासाठी दुसऱ्या डावात 141 धावांची शानदार खेळी केली.

Ranji Trophy 2024 Final Match l विदर्भ आणि मुंबईतमध्ये होणार फायनल :

विदर्भ आणि मुंबई यांच्यातील ही जेतेपदाची लढत रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगळी असणार आहे. कारण रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना काहीसा वेगळा असेल. कारण पहिल्यांदाच विजेतेपदाचा सामना महाराष्ट्राच्या दोन संघांमध्ये होत आहे.

Ranji Trophy 2024 Final Match l काय आहे विदर्भ आणि मुंबईचं गणित? :

रणजी ट्रॉफीचा 89 वा मोसम सुरू आहे. आतापर्यंत वानखेडे मैदानावर 11 वेळा रणजी ट्रॉफीचा फायनल सामना झाला आहे. अशातच यावर्षीचा देखील अंतिम सामना बाराव्यांदा वानखेडेवर स्टेडियमवरच होणार आहे. मुंबई हा रणजी ट्रॉफीचा सर्वात यशस्वी संघ आहे, जो आतापर्यंत 41 वेळा चॅम्पियन बनला आहे.

विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी विदर्भाने दोन वेळा विजेतेपदावर कब्जा केला आहे. अशातच आता तिसऱ्यांदा विजेतेपदाची मालिका तो कायम राखू शकतो की नाही हे पाहायचे आहे.

News Title : Ranji Trophy 2024 Final Match

महत्त्वाच्या बातम्या-

हर हर महादेव..! भारतातील या शहरांमध्ये मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी करा

भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचं तिकीट फायनलचं? कोण आहेत मुरलीधर मोहोळ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आज या वेळेत धावणार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी तब्बेतीची काळजी घ्यावी

‘मी कोणालाही त्रास देत नाही, आधी त्यांनी…’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट