मनोज जरांगेंना मोठा धक्का!; मराठा कुणबी नोंदणीबाबत जरांगेंचा ‘तो’ दावा खोटा

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणामुळे राज्यात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेेेशन ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र मनोज जरांगेंना ते मान्य नसल्यामुळे जरांगे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशी जरांगेंची मागणी आहे. दरम्यान जरांगेंनी 57 लाख 41 हजार 241 कुणबी मराठा नोंदी सापडल्याचा दावा केला होता. मात्र ही आकडेवारी चुकीची असल्याचं बबनराव तायवडेंनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या आंदोलानंतर राज्यात मराठा कुणबी नोंदीसाठी शोध सुरु केला. या वेळेस राज्यात एकूण 57 लाख पेक्ष आधिक कुणबी-मराठा नोंदी सापडल्याचा दावा जरांगेंनी केला. शिवाय त्यापैकी 38 लाख पेक्षा आधिक कुणबी प्रमाणपत्र निर्गमित झाल्याचं देखील जरांगेंनी म्हटलं होतं. परंतू, या संपूर्ण दाव्याची सत्यता वेगळी आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात फिरून 24 ऑक्टोबर 2023 नंतर म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर निर्गमित केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची अचूक संख्या शोधून काढली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी ज्या 57 लाख 41 हजार 241 कुणबी मराठा नोंदी सापडल्याचा दावा केला त्याची सत्यता वेगळ आहे. कारण फक्त 1 लाख 71 हजार 100 कुणबी प्रमाणपत्र जरांगेंच्या आंदोलन सुरू झाल्यानंतर निर्गमित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यात फक्त 25 हजार नोंदी-

एवढंच नाही तर, जिल्ह्यामध्ये देखील याबाबत माहिती घेण्यात आली होती. तर पुणे, सांगली, सातारा सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात आणि आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या असल्याचं समोर आलं. या दोन्ही विभागात मिळून फक्त 25 हजार 800 कुणबी प्रमाणपत्र जरांगे यांच्या आंदोलनानंतर निर्गमित झालेले आहेत. त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिल्याच्या जरांगेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जरांगे पाटलांची चौकशी-

जरांगे पाटील आता नेत्यांची भाषा करत आहेत. याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ देखील झाला आणि त्यानंतर विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

News Title : manoj jarange patil claimed about false kunbi record

महत्त्वाच्या बातम्या-

…तर विराट कोहली IPL खेळणार नाही; चाहते नाराज

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

ब्रेकिंग न्यूज! या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार

सकाळी रिकाम्या पोटी धावणे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत

कमाईची संधी गमावू नका! आज या 3 कंपन्यांचे IPO उघडणार