अचानक छातीत कळा, तब्येत बिघडली…; मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहेत. सरकार जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत उपोषण करत राहणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. दरम्यान, मराठा बांधावांनी विनंती केल्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषण थांबवलं. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेण्यास सुरुवात केली.

जरांगेंच्या तब्येतीत बिघाड-

अनेक महिन्यांपासून जरांगे (Manoj Jarange Patil)  मराठा आरक्षणासाठी कसलाच विचार न करता आंदोलन आणि उपोषण करत आहेत. मात्र, त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान आज (02 मार्च) रोजी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठा समाजात काळजी व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र जरांगेंनी (Manoj Jarange Patil)  कंबर कसली. त्यानंतर त्यांनी उपोषण केलं. या शिवाय राज्यभर दौरे करत सभा घेतल्या त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. मात्र, त्यानंतर देखील जरांगेंवर उपचार सुरु होते. मात्र, जरांगेंना रात्रीच असवस्थ वाटू लागल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलवण्यात आलं असता जरांगेंचा इसीजी काढला.

या वेळी डाॅक्टर म्हणाले की, अनेक दिवसांपासून उपोषण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम झाला आहे. जरांगेंनी काही दिवस आराम करावा. जरांगेंचा रात्री उशीरा इसीजी काढला मात्र, सुदैवाने यामध्ये कोणताच धोका नाहीये. अशक्तपणामुळे त्यांच्या छातीत कळा मारल्याचं डाॅक्टरांनी स्पष्ट केलं.

पुढे काय म्हणाले?

जरांगेंचे पल्स सध्या चांगले आहेत. मात्र छातीत कशामुळे दुखत आहे, याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवावं लागेल, असं डॉक्टर म्हणालेत.

उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात होती. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईलादेखील निघाले होते. पण दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा जालन्याच्या अंतरवली सराटी गावात आले.

News Title : manoj jarange patil latest health update

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का;…म्हणून गौतम गंभीर निवडणूक लढवणार नाही

तुमच्या वाहनालाही VIP क्रमांक हवायं? तर या 7 स्टेप्स करा अन् VIP क्रमांक मिळवा

नीता-मुकेश अंबानींचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; एकदा पाहाचं

तुमचं आधारकार्ड अपडेट करायचंय? तर खाली दिलेली प्रोसेस करून घरबसल्या अपडेट करू शकता

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल