तुमचं आधारकार्ड अपडेट करायचंय? तर खाली दिलेली प्रोसेस करून घरबसल्या अपडेट करू शकता

Aadhar Card Online Update l आधार कार्ड हे आजकाल अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे आहे. आधारकार्डचा उपयोग हा शिक्षण, बँकिंग, सरकारी कार्यालय, सरकारी योजना यासंह विविध ठिकाणी केला जातो. मात्र जर तुमच्या आधार कार्ड मध्ये काही चूक असल्यास अशावेळी नेमकं काय केलं पाहिजे हे माहिती असं महत्वाचं आहे. अशावेळी तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने आधारकार्ड उपडेट करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच UIDAI ही आधार जारी करणारी सरकारी संस्था तुम्हाला आधार ऑनलाइन अपडेट करण्याची परवानगी देत असते. (Aadhar Card Online Update Process)

जर तुम्हाला त्याच्या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर ते सहज करता येईल. लक्षात ठेवा की आधार वेबसाइटवर फक्त पत्ता ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो. मात्र आधारकार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक हा आधारशी नोंदणीकृत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला सर्वात आधी जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्यावा लागणार आहे.

Aadhar Card Online Update l आधार अपडेट करण्याचा ऑनलाइन मार्ग :

– आधार कार्ड अपडेट करण्यासाठी प्रथमतः UIDAI च्या https://uidai.gov.in या वेबसाइटवर जा.
– यानंतर ‘मेरा आधार’ टॅबवर क्लिक करा.
– पुढे ‘अपडेट युअर सर्व्हिस’ पर्याय निवडा.
– ‘तुमच्या आधारमध्ये पत्ता अपडेट करा’ या लिंकवर क्लिक करा.
– यानंतर तुम्ही या लिंकवरून तुम्ही आधार कार्डवरची चुकीची माहिती आणि पत्ता अपडेट करू शकता.
– यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
– तसेच तुम्हाला लॉगिनसाठी नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येईल तो OTP प्रविष्ट करावा लागेल.
– लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पत्ता अपडेट करण्याचा पर्याय मिळेल.
– यानंतर पुढे त्या पर्यायावर जा आणि नवीन पत्त्याची योग्य माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आणि फी पेमेंट करा वर क्लिक करा.
– फी भरल्यानंतर सेवा विनंती क्रमांक (SRN) तयार केला जाईल.

News Title : Aadhar Card Online Update Process

महत्त्वाच्या बातम्या-

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

अबब! अनंत-राधिकाच्या लग्नात तब्ब्ल ‘इतके’ कोटी रुपये खर्च होणार

तुम्ही अशाप्रकारे घरबसल्या FASTag KYC खरेदी करू शकता!

आज पुण्यात गारपिटीची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी