जरांगेंना नेमकं झालंय तरी काय?; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने मराठा बंधावांनी चिंता व्यक्त केली. या आधी देखील जरांगेंच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला होता. परंतू त्यांना पहिल्यांदाच छातीत कळा मारल्याने सगळीकडे भितीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान (01 मार्च) ला रात्रीच्या सुमारास जरांगेंच्या छातीत कळा मारल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलवण्यात आले. या वेळी डाॅक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

काय म्हणाले डाॅक्टर?

माध्यमांशी बोलत असताना डाॅक्टर म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून जरांगे (Manoj Jarange Patil) कायम आमरण उपोषण करत आहेत. शिवाय काही दिवस त्यांनी राज्यभर दौरे करत सभा घेतल्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. रात्री जरांगेंना छातीत अचानक कळा मारल्यानंतर त्यांना सलाईन लावलं शिवाय त्यांचा इसीजी काढला मात्र, त्यांचा इसीजी नाॅर्मल आला आहे.

जरांगेंच्या पल्सबद्दल अपडेट-

पुढे डाॅक्टर म्हणाले की, जरांगेंना प्रचंड आशक्तपणा आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांनी आराम करावा. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठा समाजात काळजी व्यक्त केली जात आहे. जरांगेंचे पल्स सुद्धा चांगले आहेत. मात्र छातीत कशामुळे दुखत आहे, याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवावे लागेल, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉ. विष्णू सकुंडे यांनी दिली आहे.

उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात होती. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी जरांगे आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला जाण्याची घोषणा देखील केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा जालन्याच्या अंतरवली सराटी गावात आले.

उपोषणामुळे प्रकृती खालावली-

मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र जरांगेंनी (Manoj Jarange Patil)  कंबर कसली. त्यानंतर त्यांनी उपोषण केलं. या शिवाय राज्यभर दौरे करत सभा घेतल्या त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. मात्र त्यानंतर देखील जरांगेंवर उपचार सुरु होते. मात्र, जरांगेंना रात्रीच अस्वस्थ  वाटू लागल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलवण्यात आलं असता जरांगेंचा इसीजी काढला.

News Title : manoj jarange patil health update dr. said

महत्त्वाच्या बातम्या-

अचानक छातीत कळा, तब्येत बिघडली…; मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी

भाजपला मोठा धक्का;…म्हणून गौतम गंभीर निवडणूक लढवणार नाही

तुमच्या वाहनालाही VIP क्रमांक हवायं? तर या 7 स्टेप्स करा अन् VIP क्रमांक मिळवा

नीता-मुकेश अंबानींचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; एकदा पाहाचं

तुमचं आधारकार्ड अपडेट करायचंय? तर खाली दिलेली प्रोसेस करून घरबसल्या अपडेट करू शकता