नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? या ठिकाणी तुम्हाला मिळेल 60 हजारापर्यंत डिस्काउंट

Maruti Suzuki Discount l प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते की आपल्याकडे स्वतःच्या हक्काची एक चांगली फोर व्हिलर कार असावी. आणि जर तुम्ही देखील सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ‘मारुती सुझुकी’ने काही खास ऑफर आणल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला 50 हजार ते 1 लाखांपर्यंत डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. तसेच नक्की ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीच्या कार काही प्रमाणात स्वस्त असल्याचे सांगतले जाते. त्यामुळे आपण आज जाणुन घेणार आहोत नक्की मारुती सुझुकीच्या गाड्यांवर काय आहेत ऑफर्स…

Maruti Suzuki Discount l मारुती सुझुकीच्या गाड्यांवर नेमकी ऑफर काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या कारवर आताच्या घडीला जबरदस्त सवलत उपलब्ध असून या यादीत कंपनीच्या लोकप्रिय सेडान, हॅचबॅक आणि एसयूव्ही कारचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे यांचा देखील समावेश असल्याचे सांगतले जाते. तर काही ऑफर मारुतीच्या NEXA मॉडेल्सवर लागू असून ज्यात बलेनो, इग्निस, ग्रँड विटारा, मारुती जिमनी सारख्या कारचा समावेश आहे.

Maruti Suzuki Discount l जाणून घ्या कोणत्या गाडीवर किती सूट :

Maruti Suzuki Baleno : मारुती बॅलेनोच्या किमतीवर साधारण 20 हजार रुपयांची रोख सवलत असून 17 हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि दोन हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. ही ऑफर 29 फेब्रुवारीपर्यंत 2024 आणि 2023 या दोन्ही वर्षांच्या मॉडेल्सवर लागू असणार आहे.

Maruti Suzuki Ciaz : मारुती सियाझच्या 2024मधल्या मॉडेल्सवर तुम्हाला एकूण 25 हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि दोन हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जाणार आहे. तर 2023मधल्या मॉडेल्सवर मारुती तुम्हाला 25 हजार रुपयांची अतिरिक्त रोख सूट देत आहे.

Maruti Suzuki Jimny : 2023 मध्ये मार्केट मध्ये आलेली मारुती जिमनी या कारच्या मॉडेल्सवर तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंतची रोख सूट दिली जात आहे. मारुतीची हि सर्वात भन्नाट ऑफर असल्याचे सांगतले जाते.

Maruti Suzuki Grand Vitara : मारुतीच्या नामांकित ग्रँड विटाराच्या 2023 मॉडेलवर तुम्हाला तब्बल 25,000 रुपयांची सूट दिली जात असून त्याच वेळी, व्हिटाराच्या 2024 मॉडेलवर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

यासोबतच मारुतीच्या Maruti Suzuki Ignis, Maruti Suzuki Fronx सोबत इतर गाड्यांवर 50 हजाराहून अधिक रुपयांची सूट मिळत आहे. हि ऑफर फक्त 29 फेब्रुवारीपर्यंतच असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

News Title : Maruti Suzuki Discount

महत्वाच्या बातम्या – 

आजचे राशिभविष्य! या राशीच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त होतील

अरे वा…लुना मोपेड लॉन्च! फुल चार्जमध्ये धावणार तब्बल इतके किलोमीटर; ‘ही’ असतील खास वैशिष्ट्य

अनुपम खेर झाले भावुक…अवघे 37 रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि आता…

वयाच्या 44 व्या वर्षी असा कॅच कोण घेत रे भाऊ? CSk च्या खेळाडूने घेतला असा कॅच की…

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! या भागात पडणार अवकाळी पाऊस