पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

Maharashtra School Timing Change l पालक व विद्यार्थ्यांनो राज्यातील शाळा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेच्या वेळेमध्ये बदल केला आहे. या बदलत्या वेळेनुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आता सकाळी 9 वाजेनंतर भरवण्याबाबत निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

Maharashtra School Timing Change l सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून निर्णय लागू होणार :

सरकारने याबाबत शासन परिपत्रक देखील जरी केलं आहे. विद्यार्थ्यांच्या शाळांसंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना दिली होती.

राज्यपालांच्या या सूचनेनुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या वर्षांपासून म्हणजेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra School Timing Change l शाळेच्या वेळा बदलण्याचे हे आहे कारण? :

राज्यातील काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून येत आहे. यासह विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना आढळत आहे.

त्यामुळे पालकांच्या मते पाल्याची म्हणजेच विद्यार्थ्यांची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. तसेच रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात याच कारणामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी दिसून येतो. यासर्व कारणांमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

News Title : Maharashtra School Timing Change

महत्वाच्या बातम्या – 

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? या ठिकाणी तुम्हाला मिळेल 60 हजारापर्यंत डिस्काउंट

आजचे राशिभविष्य! या राशीच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त होतील

अरे वा…लुना मोपेड लॉन्च! फुल चार्जमध्ये धावणार तब्बल इतके किलोमीटर; ‘ही’ असतील खास वैशिष्ट्य

अनुपम खेर झाले भावुक…अवघे 37 रुपये घेऊन मुंबईत आले होते आणि आता…

वयाच्या 44 व्या वर्षी असा कॅच कोण घेत रे भाऊ? CSk च्या खेळाडूने घेतला असा कॅच की…