अजित पवार गटाला मोठा धक्का! हा बडा नेता पुन्हा शरद पवारांकडे परतला

Nilesh Lanke To Join Sharad Pawar l लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज शरद पवार गटात सामील होणार आहेत. नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवारांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते.

Nilesh Lanke To Join Sharad Pawar l लोकसभा निवडणुका तारखा लवकरच जाहीर होणार :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. अशातच अहमदनगरची जागा खूपच चर्चेत आहे. आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंके यांच्या पत्नीही सक्रिय दिसत आहेत.

विखे विरुद्ध लंके अशी लढत होणार! :

तसेच सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे या देखील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके याही शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कव्हर करत आहेत. त्यामुळे अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध लंके अशी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

News Title : Nilesh Lanke To Join Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना पोटाचे विकार जाणवू शकतात

रात्री घुबड दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या यामागचे सत्य

केंद्र सरकारने कांद्या संदर्भात घेतला मोठा निर्णय! आखला जबरदस्त प्लॅन

भारतीयांना ऑस्कर 2024 सोहळा कुठे व कधी पाहता येणार?

बाईक खरेदी करण्याआधी ABS आणि Non ABS बाइक्समध्ये काय फरक असतो हे माहित असायलाच हवं!