Penalty on Tobacco Product Makers l नागरिकांनो…पान-मसाला आणि तंबाखूबाबत बदलले नियम! वाचा सविस्तर

Penalty on Tobacco Product Makers l पान मसाला, तंबाखू आणि गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1 एप्रिलपासून मोठा दंड आकारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जीएसटी कौन्सिलकडून आज एक नवीन ॲडव्हायजरी जारी करण्यात आली असून त्यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जीएसटीने जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार, तंबाखू उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांना 1 एप्रिलपासून त्यांच्या पॅकिंग मशीनची जीएसटी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागणार आहे.

Penalty on Tobacco Product Makers l एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार :

तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीने जीएसटी अधिकाऱ्यांकडे पॅकिंग मशिनरी नोंदणी न केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. सरकारच्या या पावलाचा उद्देश तंबाखू उत्पादन क्षेत्रातील महसुलाची गळती थांबवणे हा आहे. वित्त विधेयक, 2024 ने केंद्रीय GST कायद्यामध्ये सुधारणा सादर केल्या आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की तेथे नोंदणी न केलेल्या प्रत्येक मशीनवर 1 लाख रुपये दंड आकारला जाईल.

नोंदणीची प्रक्रिया सुरू :

जीएसटी कौन्सिलच्या शिफारशीच्या आधारे, कर अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी तंबाखू उत्पादकांकडून मशीनच्या नोंदणीसाठी विशेष प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याची पॅकिंग मशीन, नव्याने बसवलेल्या मशीन्ससह या मशीन्सच्या पॅकिंग क्षमतेचा तपशील फॉर्म GST SRM-I मध्ये द्यावा लागेल. मात्र गेल्या वर्षी यासाठी कोणत्या प्रकारचा दंड आकारण्यात आला याची माहिती देण्यात आली नव्हती.

Penalty on Tobacco Product Makers l नोंदणी का केली जात आहे?

महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलने गेल्या बैठकीत निर्णय घेतला होता की पान मसाला, गुटखा आणि तत्सम उत्पादनांच्या मशीनची नोंदणी करावी जेणेकरून आम्ही त्यांच्या उत्पादन क्षमतेवर लक्ष ठेवू शकेल.

तसेच गेल्या वर्षीपर्यंत नोंदणी न करणाऱ्यांवर कोणताही दंड आकारला जात नव्हता. सद्य:स्थितीत यासाठी काही दंड आकारावा असा निर्णय यावेळी परिषदेने घेतला आहे. या कारणास्तव आता नोंदणी न करणाऱ्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जीएसटी परिषदेने पान मसाला आणि गुटखा व्यवसायातील करचोरी रोखण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीच्या अहवालाला मंजुरी दिली होती.

News Title : Penalty on Tobacco Product Makers

महत्वाच्या बातम्या – 

Rohit sharma Catch l वयाच्या 36 व्या वर्षी हिटमॅनची एवढी दमदार फिल्डिंग की पुन्हा पुन्हा पाहतच राहावा वाटते! पाहा व्हिडिओ

Post Office Old Age Scheme l नातवंडांनो…तुमच्या ही आजी आजोबांचे पैसे या योजनेत गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा

Ganpat Gaikwad Firing l बापरे! या जिल्ह्यातील तब्बल 4 हजार जणांकडे बंदुकी

Amol Kolhe Viral Video l अमोल कोल्हेंचा राम मंदिराबाबतचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Politics Breaking News l राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता! आश्चर्यचकित करणारा सर्वे समोर