Rule Change 1 February 2024 l तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे नियम

Rule Change 1 February 2024 l फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीला काही नवे नियम लागू केले जातात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. यावेळी देखील फास्टॅगसह IMPS, NPS, SBI होम लोनचे KYC सारख्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात 1 फेब्रुवारीपासून कोणकोणते बदल होणार आहेत. (Rule Change 1 February 2024)

IMPS :

1 फेब्रुवारीपासून IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने जारी केलेल्या नियमांनुसार IMPS द्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी लाभार्थी आणि IFSC कोडची आवश्यकता नाही. 1 फेब्रुवारीपासून बँक खात्यात पैसे मिळवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आणि नाव टाकून पैसे सहज ट्रान्सफर करता येतील.

Rule Change 1 February 2024 l SBI होम लोन सवलत :

सध्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या ऑफर अंतर्गत गृहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर 0.65 टक्के सूट दिली जात आहे. प्रोसेसिंग फीमध्ये सूट व्यतिरिक्त इतर अनेक फायदेही दिले जात आहेत. ही ऑफर 31 जानेवारीला संपणार आहे.

NPS मधून पैसे काढणे :

पीएफआरडीएने 12 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये तुम्ही शिक्षण, लग्न, घर खरेदी आणि वैद्यकीय खर्च इत्यादींसाठी NPS मधून पैसे काढू शकता असे सांगण्यात आले होते. हा नियम 2 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहे.

Rule Change 1 February 2024 l FASTages चे KYC :

आज म्हणजेच 31 जानेवारीनंतर सर्व फास्टजेस NHAI द्वारे काळ्या यादीत टाकले जाणार आहेत. ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांचे FASTages बंद होणार आहे. अशा परिस्थितीत 1 फेब्रुवारीपासून कोणत्याही फास्टेजचे केवायसी पूर्ण होणार नाही ते वाहन टोलवर चालणार नाही.

पंजाब आणि सिंध बँक स्पेशल एफडी :

पंजाब आणि सिंध बँकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या 444 दिवसांच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी आहे. या एफडीवर 7.40 टक्के व्याज दिले जात आहे.

News Title : Rule Change 1 February 2024

महत्वाच्या बातम्या –

Tata Nexon l भारतीय बाजारात ‘या’ कारची सर्वांना क्रेझ!

Bhiksha Mukt Bharat l मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत 2026 नंतर देशात एकही भिकारी दिसणार नाही; जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन

MLA Anil Babar Death l मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीला अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल

Sleeping Habits l कमी झोपण्याच्या सवयींमुळे या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता