Shiva Balakrishna Arrests l तेलंगणातील एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात इतकी संपत्ती सापडली आहे की छापा टाकण्यासाठी गेलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाला ते पाहून धक्काच बसला आहे. तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) चे माजी संचालक शिवा बालकृष्ण यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातून 100 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Shiva Balakrishna House)
घरातून 40 लाखांची रोकड जप्त :
माजी संचालक शिवा बालकृष्ण यांचा हैद्राबाद शहरातील आलिशान बंगल्यात ACB पथक गेले असता ते घर पाहून अधिकारी देखील अवाक झाले आहेत. बालकृष्णने अनेक रिअल इस्टेट कंपन्यांना परवानग्या देऊन कोट्यवधी रुपये कमावल्याचे एसीबीच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
यावेळी शिव बालकृष्ण यांच्या घरातून 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर 2 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सापडले आहे. तसेच घरात 40 आयफोन आणि लॅपटॉप आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी बँकेतील ठेवी, व्हिला आणि प्लॉटची कागदपत्रे जप्त केली आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी शिव बालकृष्ण यांना अटक करण्यात आली असून एसीबीचे अधिकारी त्यांना आज न्यायालयात हजर (Shiva Balakrishna) करण्याची शक्यता आहे.
Shiva Balakrishna Arrests l एसीबीचे अधिकारी आज बँक लॉकर्स उघडणार :
एसीबीने बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून बालकृष्णाच्या 20 ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली होती. एसीबीच्या पथकांनी एचएमडीए आणि रेरा कार्यालयांची झडती घेतली, तर बाळकृष्ण यांच्या घरावर आणि तपासाशी संबंधित इतर महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्याच्यावर बे हिशोबी संपत्तीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली असल्याचा संशय आहे.
बालकृष्ण यांनी 200 कोटींहून अधिक संपत्ती जमा केल्याचा एसीबीला संशय आहे. शिवबालकृष्ण यांच्या घरावर एसीबीची झडती दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. एसीबी आता त्याच्या बँक लॉकर्स आणि इतर अघोषित संपत्तीची चौकशी करत आहे. एसीबीचे अधिकारी (Shiva Balakrishna House) आज कुटुंबीयांच्या उपस्थितीत बँकेचे लॉकर उघडणार आहेत.
News Title : Shiva Balakrishna Arrests
महत्वाच्या बातम्या :
Manoj Jarange Live l मराठ्यांचं वादळ शमणार? सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला
Board Exam Tips l या मार्गांनी बोर्ड परीक्षेचा ताण कमी करा आणि चांगले मार्क्स मिळवा
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! आज या राशीच्या लोकांनी प्रवास करणे टाळावा
Benefits of drinking water l शरीरात पाण्याची कमतरता आहे की नाही? तुम्ही अशाप्रकारे तपासू शकता
Bigg Boss 17 l बिग बॉस 17 ला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट! कधीआणि कुठे पाहता येईल फिनाले