आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा

Today Horoscope l मेष : कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्‍याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.

वृषभ : व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल. आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले राहील.

मिथुन : बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. पैशाचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करा.

कर्क : कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या योजनांवर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल.

Today Horoscope l सिंह : घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्‍यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.

कन्या : दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

तूळ : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्चिक : व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.

धनू : आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

मकर :कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा. व्यवसायात नवीन करारांमुळे भविष्यात नफा होईल.

Today Horoscope l कुंभ : भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कपडे, दागिने, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, जमीन खरेदी-विक्री इत्यादींशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन : अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

महत्त्वाच्या बातम्या-

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न जामनगरमध्ये होणार? काय आहे जामनगरचे कनेक्शन

महिंद्रा कंपनीने लाँच केली जबरदस्त कार; 6 एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळणार; पाहा किंमत

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी येणार PM किसान योजनेचा 16 हप्ता

या तारखेपासून सुरू होणार खरमास; या कालावधीत लग्न समारंभ पूर्णतः बंद राहणार

मार्च महिन्यात बँकांना भरमसाठ सुट्या, एवढ्या दिवस बँका राहणार बंद!