Maratha Reservation News l महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचे विधेयक शिंदे सरकारने मंजूर केले असताना देखील मराठा आंदोलकांचा रोष दिसून येत आहे. अशातच जालन्यात मराठा आरक्षणाला (Manoj Jarange Protest) विरोध करणाऱ्या आंदोलकांनी बस पेटवल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रशासन देखील ऍक्टिव मोड वर आले आहे.
Maratha Reservation News l या जिल्ह्यात संचारबंदी लागू! :
मराठा आरक्षणाच्या आक्रमक पार्श्वभूमीवर गृहविभागाने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
तसेच या वाढत्या गोंधळामुळे राज्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तब्बल 10 तासांसाठी बंद करण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिली आहे.
Maratha Reservation News l मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले मोठे आरोप :
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाचा निषेध कमकुवत करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच राज्यातील मराठ्यांना धमकावण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे.
‘या’ जिल्ह्यातील एसटी सेवा बंद :
मनोज जरांगे (Manoj Jarange Protest) यांच्या आक्रमक भूमिकेनंतर गृहविभाग अलर्ट मोडवर आला आहे. गृहविभागाने छत्रपती सम्भाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बस सेवा तात्पुरत्या बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आज एसटी बसची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
News Title : Maratha Reservation News
महत्त्वाच्या बातम्या-
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न जामनगरमध्ये होणार? काय आहे जामनगरचे कनेक्शन
महिंद्रा कंपनीने लाँच केली जबरदस्त कार; 6 एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळणार; पाहा किंमत
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी येणार PM किसान योजनेचा 16 हप्ता
या तारखेपासून सुरू होणार खरमास; या कालावधीत लग्न समारंभ पूर्णतः बंद राहणार