ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला जेवण दिलं नाही म्हणून वेटर सोबत केलं धक्कादायक कृत्य

सांगली | रोज अनेक बातम्या आपण वाचत असतो, ऐकत असतो.पण एखादी अशी बातमी कानावर पडते की आपणही म्हणतो, ऐकावं ते नवलंच!

पाळीव प्राण्यांना काही जण कुटुंबातील एक भाग समजतात. पाळीव कुत्रा असेल तर काही जण अगदी त्याला घरातील लहान मुलाप्रमाणे सांभाळतात. कुत्र्याला कुत्रा म्हटलं तरी अनेकांना राग येतो.

सांगलीत अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाळीव कुत्र्याला जेवण नाकारल्याचं निमित्त झालं आणि कुत्र्याचा मालक चांगलाच आक्रमक झाला.

वहागाव येथील राजधानी ढाब्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सांगलीत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी रात्री उशिरा या ढाब्यावर जेवायला थांबला होता. हॉटेलमधील एक वेटर त्याच्याजवळ गेला. तेव्हा त्या वेटरने आरोपीच्या कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिला.

आपल्या कुत्र्याला जेवण नाकारल्याने कुत्र्याचा मालक व वेटर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्या आरोपी मालकाने वेटरला शिवीगाळ केली.

कुत्र्याच्या मालकाने हॉटेलमधील चाकू हातात घेतला व वेटरच्या गळ्याच्या बाजूला मारला. यामुळे वेटरला चांगलीच जखम झाली. यानंतर त्या आरोपी मालकाने वेटरला रूग्णालयात दाखल केलं.

जखमी वेटरवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या वेटरने कुत्र्याच्या मालकाविरोधात पोलीसात फिर्याद नोंदवली असल्याची माहिती तळबीड पोलीसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुम्ही पण प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण जेवता का?, मग ही बातमी एकदा वाचाच

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’, ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांची MPSCला विनंती

“नितेश राणे हरवला आहे, शोधणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस”

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू

टेन्शन वाढलं! राज्यातील ‘या’ पाच बड्या नेत्यांना कोरोनाची लागण