आज पुण्यात गारपिटीची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update l राज्यात गेल्यास काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील वातावरण पाहता हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update l पुणेकरांसाठी पुढील दोन दिवस महत्वाचे :

अशातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पुणे जिल्ह्यात हवामान ढगाळ असल्याचे दिसत आहे. तसेच आज सकाळी पुण्यातील लोणी काळभोर, हडपसरसह पुणे ग्रामीण परिसरात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी (Pune Rain News) पुढील दोन दिवस फारच महत्वाचे असणार आहेत.

मध्य महाराष्ट्रात वाढत असलेल्या तापमानामुळे पुढील 2, 3 दिवसांत जोरदार पाऊस पडेल तर राज्यातील काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आज पुणे शहरात दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर तर काही भागांत गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Pune Rain News)

Maharashtra Weather Update l राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी :

वाढत्या आद्र्रतेचे प्रमाण पाहता पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस व वाऱ्याचा जोर कायम राहणार आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील काही विभागात यलो अलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे.

राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासह हवामान खात्याने ठाणे, पुणे, सातारा, रायगड, नंदूरबार, जालना, जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आज काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते.

News Title : Today Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवार यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोणता उमेदवार असणार

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मोठमोठे आजार दूर होतात; जाणून घ्या मंत्राचे फायदे

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होऊ शकते

‘तुमचं खरं रुप समोर येत आहे, समाज एवढा भोळा नाही..’; ‘या’ मंत्र्यानी जरांगे पाटलांना सुनवलं

‘माझं लक्ष…’; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट