अबब! अनंत-राधिकाच्या लग्नात तब्ब्ल ‘इतके’ कोटी रुपये खर्च होणार

Anant Ambani Radhika Merchant Wedding l जगातील आघाडीचे आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Marriage) लवकरच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहे. आजपासून म्हणजेच 1 ते 3 मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे दोघांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. अशातच आता प्री-वेडिंग कार्यक्रमाला आजपासून सुरवात झाली आहे. फंक्शनमध्ये बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे.

मुकेश अंबानी आपला लहान मुलगा अनंतच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. या लग्न सोहळ्यात अंदाजे एक हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती समोर येत आहेत. म्हणजेच, अहवालांवर विश्वास ठेवला तर अनंत अंबानींचे लग्न हे देशातील सर्वात महागडे लग्न ठरेल.

Isha Ambani Wedding l ईशा अंबानीचे देशातील सर्वात महागडे लग्न झाले होते :

अंबानी कुटुंबाची लाडकी कन्या ईशा अंबानीचे देशातील सर्वात महागडे लग्न झाले आहे. तर मुकेश अंबानी यांनी ईशा अंबानीच्या लग्नात तब्बल 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर महागड्या लग्न सोहळ्यात दुसऱ्या स्थानावर सुब्रत रॉय हे आहेत. सर्वात अवाक बाब म्हणजे ईशा अंबानीने लग्नात तब्बल 90 कोटी रुपयांचा लेहेंगा परिधान करून विश्वविक्रम केला होता.

Anant Ambani Radhika Merchant Wedding l अनंत-राधिका विक्रम करणार :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अंदाजे तब्बल 1,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. हे लग्न अंबानी कुटुंबातील सर्वात महागडे लग्न असणार आहे. त्याचबरोबर अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा देशातील सर्वात महागडा सोहळा ठरणार आहे.

या लग्न सोहळ्यात डेकोरेशन आणि लाईव्ह शोवर सर्वात जास्त खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानीच्या लग्न सोहळ्यात मिका सिंगने 10 मिनिटांच्या शोसाठी तब्बल 1.5 कोटी रुपये घेतले होते. अशातच आता रिहाना अनंतच्या लग्नात लाइव्ह शो करणार असल्याची माहिती समोर आली आहे तर अरिजित सिंग लाईव्ह परफॉर्म करणार आहेत.

News Title : Anant Ambani Radhika Merchant Wedding

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्ही अशाप्रकारे घरबसल्या FASTag KYC खरेदी करू शकता!

आज पुण्यात गारपिटीची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवार यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोणता उमेदवार असणार

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मोठमोठे आजार दूर होतात; जाणून घ्या मंत्राचे फायदे

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होऊ शकते