तुम्ही अशाप्रकारे घरबसल्या FASTag KYC खरेदी करू शकता!

Buy New FASTag l नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) भारतात ‘एक वाहन, एक फास्टॅग’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जुन्या फास्टॅगचे केवायसी असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या उपक्रमाअंतर्गत आतापासून एका वाहनासाठी एकच फास्टॅग असेल आणि हा फास्टॅग ज्या वाहनाकडे नोंदणीकृत असेल त्या वाहनासाठीच काम करेल. अशा परिस्थितीत फास्टॅग केवायसीबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. NHAI ने KYC साठी 29 फेब्रुवारी 2024 ची डेडलाईन दिली होती मात्र आता ती संपली आहे.

जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल किंवा फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नवीन फास्टॅग खरेदी करू शकता. भारतातील टोल प्लाझावर कर भरण्यासाठी वाहनावर फास्टॅग असणे आवश्यक आहे.

Buy New FASTag l अशाप्रकारे खरेदी करा ऑनलाईन फास्टॅग :

– नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) ने फास्टॅग जारी करण्यासाठी निवडक बँकांना परवानगी दिली आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर जाऊन फास्टॅग खरेदी करू शकता.
– ज्या बँकेतून तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा आहे ती बँक निवडा आणि तिच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर FASTag विभाग शोधा आणि पुढे जा.
– तुमच्या आयडी प्रूफ आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राची (RC) स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
– अर्ज पूर्ण केल्यानंतर, पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही UPI, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता.
– फास्टॅगच्या वितरणासाठी, तुम्हाला पत्त्याची माहिती आणि नाममात्र शुल्क द्यावे लागेल. अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन फास्टॅग खरेदी करू शकतं.

FASTag Documnets l फास्टॅग खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

फास्टॅग घेताना वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि फास्टॅगसाठी केवायसी, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) इत्यादी आवश्यक कागदपत्र लागतात.

News Title : Buy New FASTag Online Process

महत्त्वाच्या बातम्या-

आज पुण्यात गारपिटीची शक्यता; तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवार यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोणता उमेदवार असणार

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मोठमोठे आजार दूर होतात; जाणून घ्या मंत्राचे फायदे

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होऊ शकते

‘तुमचं खरं रुप समोर येत आहे, समाज एवढा भोळा नाही..’; ‘या’ मंत्र्यानी जरांगे पाटलांना सुनवलं