आजपासून सलग 3 दिवस बँका आणि शेअर बाजार बंद राहणार! पाहा मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी

Banks and stock markets will be closed for 3 days l आजपासून देशभरातील बँका आणि शेअर बाजार सलग 3 दिवस बंद राहणार आहेत. शिवरात्रीनिमित्त आज म्हणजेच 8 मार्चला देशभरातील बँका आणि शेअर बाजारांना सुट्टी आहे. सुट्टीमुळे NSE-BSE वरील ट्रेडिंग आजपासून पुढील 2 दिवस बंद राहणार आहे. यामध्ये 8 मार्चला शिवरात्रीमुळे सुट्टी आहे, 9 मार्चला दुसरा शनिवार आणि 10 मार्चला रविवार आहे. सोमवारी म्हणजेच 3 दिवसांनी शेअर बाजार उघडतील. याशिवाय मार्च महिन्यातील सणांमुळे शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त आणखी 6 दिवस बँका बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत ते आपण जाणून घेऊयात..

Banks and stock markets will be closed for 3 days l या ठिकाणी बँका बंद राहणार :

रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, या राज्यांमध्ये महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. त्यामुळे या राज्यांत आज सुट्टी आहे.

Banks and stock markets will be closed for 3 days l मार्चमध्ये बँका कधी बंद असणार? :

09 मार्च 2024- मार्च महिन्यात दुसऱ्या शनिवार असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
10 मार्च 2024- रविवारमुळे बँका बंद राहतील.
17 मार्च 2024- रविवारमुळे साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत.
22 मार्च 2024 – बिहार दिनानिमित्त पाटण्यातील बँकांना सुट्टी असेल.
23 मार्च 2024- चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
24 मार्च 2024 – रविवार असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
25 मार्च 2024- होळी हा सण असल्याने बेंगळुरू, चेन्नई, इंफाळ, कोची, भुवनेश्वर, कोहिमा, श्रीनगर पाटणा आणि त्रिवेंद्रम वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
26 मार्च 2024- पाटणा, भोपाळ, इंफाळ येथे याओसांग दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत.
27 मार्च 2024- पाटणा येथील बँकांना होळीनिमित्त सुट्टी असेल.
29 मार्च 2024- गुड फ्रायडेमुळे आगरतळा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

News Title : Banks and stock markets will be closed for 3 days

महत्त्वाच्या बातम्या-

भगवान महादेवाला प्रिय आहेत या वनस्पती; भोलेनाथ होईल प्रसन्न

केंद्र सरकारने महिलांना दिली खास भेट! गॅस सिलिंडर तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी केला स्वस्त

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींवर भोलेनाथ प्रसन्न होणार; मिळणार आनंदाची बातमी

आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम

PM मुद्रा योजनेद्वारे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता; असा करा अर्ज