Today Horoscope l मेष:- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल. शुभ रंग पोपटी शुभ अंक ८
वृषभ:- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.शुभ रंग लाल शुभ अंक ५
मिथुन:- नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.शुभ रंग काळा शुभ अंक २
कर्क:- हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगती च्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग पांढरा शुभ अंक ६
सिंह:- सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. शुभ रंग गुलाबी शुभ अंक २
Today Horoscope l कन्या:- आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. शुभ रंग जांभळा शुभ अंक ९
तूळ:- योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. शुभ रंग विटकरी शुभ अंक ६
वृश्चिक:- लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. शुभ रंग जांभळा शुभ अंक 5
धनू:- सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील. शुभ रंग पिवळा शुभ अंक ८
मकर:- मन:शांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. शुभ रंग नारंगी शुभ अंक ७
Today Horoscope l कुंभ:- नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. शुभ रंग गुलाबी शुभ अंक १
मीन:- बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका. शुभ रंग पोपटी शुभ अंक ५
महत्त्वाच्या बातम्या-
रात्री घुबड दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या यामागचे सत्य
केंद्र सरकारने कांद्या संदर्भात घेतला मोठा निर्णय! आखला जबरदस्त प्लॅन
भारतीयांना ऑस्कर 2024 सोहळा कुठे व कधी पाहता येणार?
बाईक खरेदी करण्याआधी ABS आणि Non ABS बाइक्समध्ये काय फरक असतो हे माहित असायलाच हवं!
कोथिंबीर करील कित्येक आजारांवर मात, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे