Onion Price in India l कांद्याचे दर वाढून सर्वसामान्य जनता रडू नये यासाठी सरकारने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी सरकार कांद्याचा राखीव साठा वाढविण्याच्या योजनेवर काम करत असून त्याअंतर्गत लाखो टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सरकार यंदाच्या वर्षी 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून बफर स्टॉक मजबूत करता येईल. त्यामुळे यंदाच्या वर्षी महिलांचे आर्थिक बजेट कोलमडणार नसल्याने त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Onion Price in India l सरकार बफर स्टॉक तयार करणार :
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार बफर स्टॉक तयार करणार आहे. त्यासाठी हंगामात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून साठवणूक केली जाते. जेव्हा किंमती वाढू लागतात, तेव्हा सरकार राखीव साठ्यातून कांद्याचा पुरवठा बाजारात करत असतो त्यामुळे कांद्याच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा हवाला देत अहवालात असे म्हटले आहे की, सरकार 5 लाख टनांचा बफर स्टॉक तयार करण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षीही सरकारने 5 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार केला होता, जो गेल्या काही महिन्यांत भाव नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरला होता. गतवर्षी निर्माण झालेल्या बफर स्टॉकमध्ये अजूनही 1 लाख टन कांदा शिल्लक आहे.
अशा प्रकारे सरकारने किमती नियंत्रित केल्या! :
एनसीसीएफ आणि नाफेड यांसारख्या संस्था सरकारच्या वतीने कांदा खरेदी करणार आहेत. गेल्या वर्षीही दोन्ही एजन्सींनी कांदा खरेदी करून त्याचा बफर स्टॉक तयार केला होता. कांद्याचे भाव गगनाला भिडू लागले तेव्हा दोन्ही संस्थांनी सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली. यासाठी एजन्सींनी डझनभर शहरांमध्ये अनेक ठिकाणी विक्री केंद्रे स्थापन केली होती आणि ONDC द्वारे ऑनलाइन उपलब्धताही सुनिश्चित केली होती.
Onion Price in India l कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादले :
देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू आहे. अलीकडेच सरकारने भूतान, बहारीन आणि मॉरिशससारख्या देशांना कांदा पुरवण्यासाठी निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले. निर्यातीवरील बंदी सुरू ठेवण्याचा किंवा उठवण्याचा निर्णय 31 मार्चनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.
News Title : Onion Price in India
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीयांना ऑस्कर 2024 सोहळा कुठे व कधी पाहता येणार?
बाईक खरेदी करण्याआधी ABS आणि Non ABS बाइक्समध्ये काय फरक असतो हे माहित असायलाच हवं!
कोथिंबीर करील कित्येक आजारांवर मात, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
सोन खरेदी करायचंय? जरा थांबा; 120 तासांत 5 वेळा केले रेकॉर्ड ब्रेक
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे