Poonam Pandey l गेल्या काही दिवसांपासून पूनम पांडे तिच्या मृत्यूचा बनाव केल्यामुळे चर्चेत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पूनम पांडे चर्चेत आली आहे. पूनम पांडे आणि तिची टीम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करत असल्याचे समोर आले आहे.
Poonam Pandey l सरकारने दिला नकार :
पूनम पांडे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर सरकारच्या सुरू असलेल्या जागरूकता कार्यक्रमाची ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याची शक्यता आहे. मात्र अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी यासंदर्भात नकार दिल्याचे समोर आले आहे.
खरं तर, या महिन्याच्या सुरुवातीला पूनम पांडेच्या पीआर टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्रीच्या मृत्यूची खोटी बातमी पोस्ट केली होती. अभिनेत्रीचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले होते. अभिनेत्रीच्या आजारपणामुळे अचानक मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण दुसऱ्याच दिवशी ही बातमी खोटी असल्याचे उघड झाले आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पूनमने हा स्टंट केला असल्याचे सांगितले आहे.
Poonam Pandey l ‘जागृतीसाठी मी माझा मृत्यू खोटा ठरवला’ : पूनम पांडे
‘इतर कर्करोगांप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी HPV लस आणि लवकर तपासण्याच्या चाचण्या आहेत. या आजाराने कोणाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. तसेच पूनम म्हणाली की, तिने फक्त गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी तिच्या मृत्यूचा बनाव केला होता.
Poonam Pandey l कोण आहे पूनम पांडे? :
पूनम पांडे व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2013 मध्ये नशा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अनेक मालिका आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय पूनम 2011 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल देखील बनली होती.
News Title : Poonam Pandey Cervical Cancer Compaign
महत्वाच्या बातम्या –
NCP Political Crisis l शरद पवार गट यापैकी एका पक्ष नावाची आणि चिन्हाची निवड करणार
Penalty on Tobacco Product Makers l नागरिकांनो…पान-मसाला आणि तंबाखूबाबत बदलले नियम! वाचा सविस्तर
Ganpat Gaikwad Firing l बापरे! या जिल्ह्यातील तब्बल 4 हजार जणांकडे बंदुकी