Indus App Store Launched l तुम्ही अँड्रॉइड डिव्हाइस वापरत असल्यास आतापर्यंत तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर कोणतेही ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store चा वापर करत असालच. Google Play Store हे अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी जगातील सर्वात लोकप्रिय ॲप स्टोअर आहे, आणि म्हणूनच बहुतेक लोक या ॲप स्टोअरमधून त्यांच्या Android डिव्हाइसवर ॲप डाउनलोड करतात. परंतु आता वापरकर्त्यांना एक नवीन पर्याय मिळणार आहे. भारतात Google Play Store ऐवजी मूळ ॲप स्टोअर लाँच होणार आहे. तर या स्टोअरबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात…
Indus App Store Launched l भारत सुरु करणार नवीन ॲप स्टोअर :
या ॲप स्टोअरचे नाव इंडस ॲप स्टोअर आहे. जे वॉलमार्टच्या मालकीचे पेमेंट ॲप PhonePe ने तयार केले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव 21 फेब्रुवारीला हे ॲप लाँच केले आहे. वापरकर्ते Google Play Store प्रमाणेच हे मूळ ॲप स्टोअर (Indus App Store) वापरू शकतील आणि त्यांचे आवश्यक Android ॲप डाउनलोड करू शकतील. आत्तापर्यंत Jio, Disney Plus Hotstar, Flipkart, Swiggy आणि Dream11 सारखे अनेक लोकप्रिय ॲप्स या ॲपमध्ये नोंदणीकृत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ॲपमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक ॲप्सची नोंदणी झाली आहे. Android डिव्हाइस वापरणारे वापरकर्ते त्यांच्या फोन किंवा टॅबवर या ॲप स्टोअरद्वारे ॲप डाउनलोड करण्यास सक्षम असतील. इंडस ॲप स्टोअरमध्ये 12 भाषांसाठी समर्थन समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी तसेच मराठी, मल्याळम आणि तमिळ इत्यादींचा समावेश आहे.
Indus App Store Launched l ॲपची मोफत नोंदणी करण्याची संधी! :
या ॲप स्टोअरची बीटा आवृत्ती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रिलीज झाली होती. हे विशेषतः भारतातील वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. ॲप डेव्हलपर या ॲप स्टोअरमध्ये त्यांच्या ॲपची नोंदणी पूर्णपणे विनामूल्य करू शकतील. मात्र ही ऑफर पहिल्या वर्षासाठीच उपलब्ध असणार आहे.
याशिवाय इंडस ॲपद्वारे (Indus App Store) कमावलेल्या कमाईवर ॲप डेव्हलपर्सना पहिल्या वर्षी कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. त्याचवेळी Google Play Store वर विकसकांना कमावलेल्या पैशातून कमिशन द्यावे लागते, परंतु Indus App Store वर देखील कमिशन फ्री ऑफर फक्त पहिल्या एक वर्षासाठी उपलब्ध आहे.
News Title : Indus App Store Launched
महत्त्वाच्या बातम्या-
…आणखी एक मोठा धक्का! भाजपच्या ‘या’ बड्या आमदाराचे निधन!
मनोहर जोशींचा… भिक्षुकीपासून ते मुख्यमंत्री असा अंगावर काटा आणणारा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास जाणवेल
‘गावातील महिलेंनी त्याच्यावर बलात्काराचे..’; जरांगेंचा बारस्करांबाबत मोठा गौप्यस्फोट
‘तो नेता सांगतो तसंच…’; संगिता वानखेडेंचा जरांगेंवर अत्यंत धक्कादायक आरोप!