पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी!; हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन्हाच्या झळा बसत आहेत. गारठा कमी होत नाही तोच राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई आणि पुणे या सारख्या शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पुण्यात सकाळी गार वारं असतं तर दुपारनंतर उकाडा सुरु होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुण्याच्या वातावरणातबदल होणार असल्याचं म्हटलं आहे.

हवामान विभागाने काय म्हटलं?

पुण्यात मागील काही दिवासांपासून उकाडा (Weather Update) वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांसमोर फेब्रवारीपासूनच घामाच्या धारा सहन कराव्या लागणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून पुण्याच्या वातावरणाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्याच्या वातावरणात घट होण्याच्या शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज (23 फेब्रवारी) रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथे 11.7 अंश सेल्सिअस, एनडीए 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वारा शांत आहे, त्यामुळे पुढील काही दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या वातावरणात बदल-

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत आकाश निरभ्र राहील आणि उत्तरेकडील वारे पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात प्रवेश करतील. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल. तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल. पुण्यातील तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होऊन ते 10 अंश सेल्सिअस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. सर्वात कमी तापमानातील ही शेवटची घसरण असू शकते.

पुण्यात दोन दिवसांपासून घट झाला आसून 18फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर येथे 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर 20 फेब्रवारीला शहरात 13 अंशापर्यंत घसरले. गेल्या 24 तासात एक अंश सेल्सिअसने घसरलेल्या कमाल तापमानातही काहीशी घट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. हवेली तालुक्यात किमान तापमान 10.9 अंश सेल्सिअस, शिरूर आणि एनडीए भागात 11.1अंश सेल्सिअस होते.

News Title : weather update for pune city from IMD

महत्त्वाच्या बातम्या-

ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर जाण्याची गरज संपली! भारताचं इंडस ॲप स्टोअर लाँच

…आणखी एक मोठा धक्का! भाजपच्या ‘या’ बड्या आमदाराचे निधन!

मनोहर जोशींचा… भिक्षुकीपासून ते मुख्यमंत्री असा अंगावर काटा आणणारा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास जाणवेल

‘गावातील महिलेंनी त्याच्यावर बलात्काराचे..’; जरांगेंचा बारस्करांबाबत मोठा गौप्यस्फोट