राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची दाट शक्यता

Maharashtra Weather Update l देशातील वातावरणात वारंवार बदल दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर भारतात उन्हाच्या झळा जाणवत होत्या. मात्र अशातच आता उत्तर भारतातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदल अगदी महाराष्ट्रात देखील जाणवत आहेत. कारण महाराष्ट्रात काही ठिकाणी उन्हाचा पारा प्रचंड परमनंट वाढत आहे तर राज्यातील काही ठिकाणी वातावरण थंड पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather Update l हवामान विभागाने वर्तवला अंदाज! :

मात्र आता या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. या बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानुसार (IMD) पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांमध्ये काही प्रमाणात बदल पाहायला मिळणार असल्याचे समोर आले आहे.

तसेच राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भात ऑरेज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरीराजा संकटात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचं संकट!

Maharashtra Weather Update l हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती व गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती व गोंदिया या जिल्ह्याना अलर्ट जारी केला आहे. याशिवाय हवामान खात्याने विदर्भासोबतच आता मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यातील वादळात वातावरण पाहता 26 फेब्रुवारीपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशात अनेक अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण शेतातील गहू, द्राक्षे, आंबा, हार्बर, ज्वारी या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

News Title : Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा समाज आक्रमक! गृहविभागाने ‘या’ जिल्ह्यांच्या इंटरनेट आणि एसटी सेवा केल्या बंद

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न जामनगरमध्ये होणार? काय आहे जामनगरचे कनेक्शन

महिंद्रा कंपनीने लाँच केली जबरदस्त कार; 6 एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळणार; पाहा किंमत

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी येणार PM किसान योजनेचा 16 हप्ता