मोठी बातमी! मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे, अखेर….

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन आणि आमरण उपोषण करत असताना दिसत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याची घोषणा केली होती. एवढंच नाही तर जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांबदल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वातवरण देखील तापलं होतं. अर्थसंकल्प अधिवेशानात जरांगेंच्या वक्तव्यावरुन देखील चर्चा झाली होती. मात्र घडलेल्या प्रकारानंतर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले जरांगे?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्यावर जरांगेंनी हल्लाबोल केला होता. एवढंच नाही तर फडणवीसांवर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अधिवेशनात फडणवीसांनी जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. दरम्यान घडलेल्या प्रकारावर जरांगेंनी माफी मागितली आहे. माध्यामांशी बोलत असताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबदल मी अपशब्द वापरले त्याबदल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

दिलगिरी व्यक्त करतो-

आमरण उपोषण सुरु असताना मी आक्रमक होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबदल आक्षपार्ह शब्द वापरले. त्यांना मी आई-बहिणीवरुन अपशब्द वापरले असतील तर मी माफी मागतो शिवाय याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. त्यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते.

फडणवीसांची प्रतिक्रिया-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या वक्तव्यावर (Manoj Jarange Patil) प्रतिक्रिया दिली होती. यावेळी ते म्हणाले होते की, “मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टीकवलं. जरांगेंवर मला बोलायचं नव्हतं. मराठा समाजासाठी मी काय केलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं. सारथीला निधी दिला, शिष्यवृत्ती दिली. कर्ज दिलं आहे.”

News Title : manoj jarange patil take one step back

महत्त्वाच्या बातम्या-

या महिला क्रिकेटरने चक्क मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ

गुड न्यूज! दीपिका पदुकोण आई होणार, ‘या’ महिन्यात होणार डिलिव्हरी

BCCI ने जाहीर केला वार्षिक करार! या चार खेळाडूंना मिळणार तब्बल 7 कोटी रुपये

आजचे राशिभविष्य! गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल

महाशिवरात्रीचे व्रत या पद्धतीने साजरे करा; होईल मनोकामना पूर्ण