मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्या संपर्कात?; ‘त्या’ नेत्याकडून महत्त्वाची माहिती उघड

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दिवस रात्र आंदोलन करत आहे. मात्र, हे सुरु असताना त्यांच्या जवळचे आणि विश्वासू असलेले जिवलग मित्र अजय महाराज बारस्कर यांनी काल माध्यमांशी बोलत असताना जरांगेंवर गंभीर आरोप केले. बोलत असताना बारस्कर म्हणाले की, मनोज जरांगे (Manoj Jarange) हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे. त्याच्या मिटिंग या नेहमी रात्री होतात. तर जरांगेंच्या सहकारी सुनिता वानखेडे यांनी देखील जरांगेंवर गंभीर आरोप केले होते.

काय आहे प्रकार?

माध्यमांशी बोलत असताना सुनिता वानखेडे म्हणाल्या की,  जरांगेंना एका नेत्याचा फोन येत होता. तो नेता दुसरा तिसरा कोणी नसून शरद पवार आहेत. शरद पवार मनोज जरांगेंना (Manoj Jarange) फोन करत होते. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.

संपर्कच झाला नाही-

शरद पवार हेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे असल्याचा आरोप आज संगीता वानखेडे यांनी केला. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असावं असा माझा अंदाज आहे.”

मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय?, याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

“आरक्षण मिळणार नाही तोवर आंदोलन”

आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाजासाठी आणि बांधवांसाठी लढत राहणार असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले होते. त्यामुळे जोवर आरक्षण नाही मिळणार तोवर आंदोलन आणि उपोषण सुरुच ठेवू, असं देखील जरांगे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, 24 फेब्रवारीला गावागावात जाऊन रास्ता रोको करणार.

3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीच्या वेळी असणारं लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

News Title : manoj jarange and sharad pawar connection

महत्त्वाच्या बातम्या-

‘जरांगेंच्या बोलण्यात दम नाही…’; ‘या’ नेत्याचा जरांगेंवर हल्लाबोल

महिलांनो या 3 टिप्स नक्की वाचा, तुमचे गुंतागुंतीचे आयुष्य होईल सोपे

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 3 दिवसांत मिळणार नवीन वीज कनेक्शन

‘ओपनहायमर’ चित्रपट ‘या’ दिवशी मोफत पाहता येणार!

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी!; हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट