Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कसलीही पर्वा न करत जरांगे आंदोलन करत आहेत. मात्र, कालपासून जरांगेंवर गंभीर आरोप होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. जरांगेंचा जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय बारसकर यांनी जरांगेवर आरोप केले आहेत. मात्र, आता मंत्र्यांनी देखील जरांगेंना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
काय आहे प्रकरण?
जरांगे पाटील (Manoj Jarange) मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून नव्याने आंदोलन करत आहेत. मात्र, जरांगेंनी 24 फेब्रवारीपासून राज्यात रास्ता रोको करणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयावर आता उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, “जरांगे (Manoj Jarange) पाटलांकडून सगेसोयरे कायद्याबाबत मागणी होत आहे. मात्र त्यावर ज्या सूचना हरकती आल्या आहेत, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. तसं झालं नाही तर कोर्टात ते आरक्षण कायदा टिकणार नाही, त्यामुळं आता हे सगळं थांबवा. मराठा समाजाचेच नुकसान होईल असं असताना पण मनोज जरांगे पाटलांकडून रास्ता रोकोची घोषणा दिली जात आहे”.
विद्यार्थांचे हाल होतील-
या वेळी ते म्हणाले की, “24 आणि 29 तारखेला गावागावात रास्तारोको होणार आहे. त्यामुळे, मराठा आंदोलनामुळे आणि रास्ता रोकोमुळे बारावीचे विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होती, असं शंभूराजे देसाई म्हणाले आहेत. अशी स्पष्टपणे भूमिका मांडत शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पुढच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
आरक्षण मान्य नाही-
3 दिवसांपूर्वी सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेतलं आणि मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण दिलं. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही ठाम आहोत, असं जरांगे म्हणाले. दरम्यान, 29 फेब्रवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे म्हणाले. तसेच 3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळच्या वेळी असणारी लग्नं संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
News Title : Manoj Jarange stop the maratha protest
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्या संपर्कात?; ‘त्या’ नेत्याकडून महत्त्वाची माहिती उघड
‘जरांगेंच्या बोलण्यात दम नाही…’; ‘या’ नेत्याचा जरांगेंवर हल्लाबोल
महिलांनो या 3 टिप्स नक्की वाचा, तुमचे गुंतागुंतीचे आयुष्य होईल सोपे
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 3 दिवसांत मिळणार नवीन वीज कनेक्शन
‘ओपनहायमर’ चित्रपट ‘या’ दिवशी मोफत पाहता येणार!