‘जरांगेंच्या बोलण्यात दम नाही…’; ‘या’ नेत्याचा जरांगेंवर हल्लाबोल

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कंबर कसत आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. दरम्यान, 3 दिवसांपूर्वी सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेतलं आणि मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण दिलं. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आम्ही ठाम आहोत असं जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंवर साधला निशाणा-

दरम्यान, मराठा आरक्षणामुळे राज्यातच नव्हे तर राजकारणात देखील वातावरण तापल्याचं चित्र पहायला मिळत आहे. राजकारणातील अनेक विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टिक्का करत असताना दिसत असतात. शिवाय नेते देखील जरांगेवर निशाणा साधताना दिसत असतात. मात्र, एका कार्यक्रमात बोलत असताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘जरांगे (Manoj Jarange) यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाहीये.’ दरम्यान, माध्यामांशी संवाद साधत असताना जरांगेंनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केला.

काय म्हणाले जरांगे?

विजय वडेट्टीवार पलटवार करत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, “मला तुम्ही दम शिकवू नका, तुमचं बघा यावेळी कुठे टेकतं, त्या धोरणाला लागा, राहुल गांधींनी मराठ्यांच्या नादी लागायला तुम्हाला सांगितले आहे का?,

मराठा समाजावर टीका कर असे राहुल गांधी म्हणाले का?, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात की कोण आहात. तुमच्या स्वतःच्या घराचे पद नाही, विरोधी पक्षनेते पद जनतेचं पद आहे. तुला दम काढायचं कुणी सांगितलं. तू काय आमचं दम बघणार, मुंबईत पाहिले नाही का?

पक्ष कसं वाढवता येईल ते बघ-

जरांगेंनी वडेट्टीवारांवर संताप व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले की, “तुला शौचालयला देखील जाता येणार नाही. राहुल गांधी असले कशासाठी निवडतात. पक्ष कसं वाढवता येईल ते धोरण बघ, इकडे मराठ्यांच्या आंदोलनात कशासाठी बोलत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.”उद्यापासून राज्यभरातील प्रत्येक गावात रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. सोबतच 3 मार्चला मात्र जिल्ह्यात एकच आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी एकत्रित येऊन एकाच ठिकाणी हे आंदोलन करायचं आहे.

News Title : vijay wadettiwar talks on manoj jarange

महत्त्वाच्या बातम्या –

महिलांनो या 3 टिप्स नक्की वाचा, तुमचे गुंतागुंतीचे आयुष्य होईल सोपे

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 3 दिवसांत मिळणार नवीन वीज कनेक्शन

‘ओपनहायमर’ चित्रपट ‘या’ दिवशी मोफत पाहता येणार!

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी!; हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर जाण्याची गरज संपली! भारताचं इंडस ॲप स्टोअर लाँच