‘ओपनहायमर’ चित्रपट ‘या’ दिवशी मोफत पाहता येणार!

Oppenheimer On OTT l हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनने गेल्या वर्षी ओपनहायमर नावाचा चित्रपट बनवला आणि यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. या Cillian Murphy स्टारर चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. चित्रपटगृहामध्ये ओपनहायमर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अगदी काही महिन्यांनंतरच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. अशातच आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहता येणार आहे.

Oppenheimer On OTT l कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येईल चित्रपट :

ओपेनहाइमर्स हा चित्रपट अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणुबॉम्ब बनवण्याच्या योजनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोठ्या पडद्यावर, हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने रॉबर्टची व्यक्तिरेखा खूप छान साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर आता तुम्हाला ओपनहायमर ऑनलाइन मोफत पाहण्याची खास संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2024 रोजी ओपेनहाइमर OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर मोफत स्ट्रीम होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते ओपेनहायमरच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Oppenheimer On OTT l ओपेनहायमर ऑस्करमध्ये धमाल करणार! :

नुकतेच आगामी अकादमी पुरस्कार 2024 साठी चित्रपटांची नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान Cillian Murphy’s Oppenheimer ला 96 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये 13 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. अशा परिस्थितीत ओपेनहायमर ऑस्कर पुरस्कार यशस्वी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

21 जुलै 2023 रोजी ओपनहेमर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. यानंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 149 रुपये खर्च करावे लागत असत. मात्र आता हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे.

News Title : Oppenheimer On OTT

महत्त्वाच्या बातम्या-

ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर जाण्याची गरज संपली! भारताचं इंडस ॲप स्टोअर लाँच

…आणखी एक मोठा धक्का! भाजपच्या ‘या’ बड्या आमदाराचे निधन!

मनोहर जोशींचा… भिक्षुकीपासून ते मुख्यमंत्री असा अंगावर काटा आणणारा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास जाणवेल

‘गावातील महिलेंनी त्याच्यावर बलात्काराचे..’; जरांगेंचा बारस्करांबाबत मोठा गौप्यस्फोट