Manoj Jarange Patil | सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मराठा बांधवांच्या आग्रहाखातर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र, जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसामधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार असं म्हटलं आहे. मनोज जरांगेंना लाखो मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी सुद्धा आरक्षण मिळेपर्यंत ते आंदोलन करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
माध्यमांशी बोलत असताना जरांगेंनी (Manoj Jarange Patil) सरकारवर निशाणा साधाला. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत महत्त्वाचा इशारा देखील दिला आहे. जरांगे म्हणाले की, ‘मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात’ असं म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. जरांगे आज सोलापूर जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत.
सहा महिने वेळ दिला-
पुढे जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला, पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करत असतो. नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत.
जरांगेंच्या नव्या चित्रपटाची चर्चा-
मनोज जरांगेंंनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा व आतापर्यंत केलेले आरक्षणासाठी केलेला संघर्ष यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संघर्ष योद्धा असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी उभे केलेले आंदोलन याबाबत या चित्रपटात असल्याचं टीझरवरून स्पष्ट होत आहे.
संघर्ष योद्धा या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती हे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत , शिवाजी दोलताडे यानी दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. डॉ.सुधीर निकम यांची संवाद आणि पटकथा आहे.
News Title : manoj jarange patil criticize eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी बायकोला सांगितलंय…’; मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याची तूफान चर्चा
मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सगळीकडे एकच चर्चा
महाशिवरात्रीला अशाप्रकारे भोलेनाथाची पूजा करा; होईल मनातील इच्छा पूर्ण
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज
‘पहला नशा’…आमिर खान आणि नीता अंबानीचा तो डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल