आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील

l मेष:- मानसिक व्यग्रता जाणवेल. अतिविचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका. शुभ रंग विटकरी शुभ अंक ७

वृषभ:- वेळेचे बंधन पाळावे लागेल. घाई गडबडीत कामे उरकू नका. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. शुभ रंग पांढरा शुभ अंक ४

मिथुन:- मनात विचारांचा गोंधळ उडेल. ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.शुभ रंग विटकरी शुभ अंक २

कर्क:- लहानशा अपयशाने खचून जाऊ नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.शुभ रंग निळा शुभ अंक ६

सिंह:- जवळचे मित्र भेटतील. कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील.शुभ रंग हिरवा शुभ अंक ८

Today Horoscope l कन्या:- अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. शुभ रंग काळा शुभ अंक ३

तूळ:- सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल. मोठ्या ,प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. अचानक धनलाभाची शक्यता.शुभ रंग नारंगी शुभ अंक ९

वृश्चिक:- जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कामाला गती मिळेल.शुभ रंग पिवळा शुभ अंक ४

धनू:- मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. शुभ रंग लाल शुभ अंक ३

मकर:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सुस्वभावी लोकांच्यात वावराल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल.शुभ रंग पोपटी शुभ अंक ८

Today Horoscope l कुंभ:- कामातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.शुभ रंग गुलाबी शुभ अंक ७

मीन:- वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.शुभ रंग काळा शुभ अंक 9

महत्त्वाच्या बातम्या-

‘आम्ही मराठे करेक्ट कार्यक्रम करु…’; जरांगेंकडून सर्वात मोठा इशारा

‘मी बायकोला सांगितलंय…’; मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याची तूफान चर्चा

मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सगळीकडे एकच चर्चा

महाशिवरात्रीला अशाप्रकारे भोलेनाथाची पूजा करा; होईल मनातील इच्छा पूर्ण

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज