जरांगेंचा इसीजी काढल्यानंतर डाॅक्टरांकडून मोठा खुलासा!

Manoj Jarange Patil | मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील दिवस रात्र एक करुन आंदोलन करत आहेत. एवढंच नाही तर गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी राज्यभर दौरे देखील केले. मात्र, त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. असं असताना अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून कसलाच विचार न करता मराठा समाजासाठी लढा देत आहेत. जोपर्यंत सरकार ओबीसीमधून आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहणार असं जरांगे म्हणाले. मात्र, मराठा समाजाच्या आग्रहानंतर जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं.

दरम्यान, रात्री जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) प्रकृतीत बिघाड झाल्याने मराठा बांधवांनी चिंता व्यक्त केली. पहिल्यांदाच छातीत कळा मारल्याने सगळीकडे भितीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान (01 मार्च) ला रात्रीच्या सुमारास जरांगेंच्या छातीत कळा मारल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलवण्यात आले. जरांगेंना छातीत अचानक कळा मारल्यानंतर त्यांना सलाईन लावलं शिवाय त्यांचा इसीजी काढला मात्र, त्यांचा इसीजी नाॅर्मल आला असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

काय म्हणाले डाॅक्टर?

मराठा आरक्षणासाठी दिवस रात्र जरांगेंनी (Manoj Jarange Patil)  कंबर कसली. त्यानंतर त्यांनी उपोषण केलं. या शिवाय राज्यभर दौरे करत सभा घेतल्या त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. मात्र त्यानंतर देखील जरांगेंवर उपचार सुरु होते. जरांगेंना रात्रीच अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलवण्यात आलं असता जरांगेंचा इसीजी काढला. अॅसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

अशक्तपणामुळे तब्येत खालावली-

एसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

News Title : manoj jarange patil health update after ECG

महत्त्वाच्या बातम्या-

जरांगेंना नेमकं झालंय तरी काय?; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी स्पष्टच सांगितलं

अचानक छातीत कळा, तब्येत बिघडली…; मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी

भाजपला मोठा धक्का;…म्हणून गौतम गंभीर निवडणूक लढवणार नाही

तुमच्या वाहनालाही VIP क्रमांक हवायं? तर या 7 स्टेप्स करा अन् VIP क्रमांक मिळवा

नीता-मुकेश अंबानींचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; एकदा पाहाचं