या नेत्याला मराठ्यांचं काहीही देणे-घेणे नाही… मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी राज्य सरकार महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावणार आहे. मराठा आरक्षणाबाबत या अधिवेशनात प्रस्ताव येणार आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी आयोगाच्या संपूर्ण अहवालाला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार विधानसभेत याबाबत कायदा करणार आहेत.

Manoj Jaranag Patil | मनोज जरांगे यांचा इशारा :

आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी मराठ्यांच्या ‘रक्ताच्या नात्यां’शी संबंधित मसुदा अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे आहे. या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाला पुष्टी दिली आहे. जरांगे पाटील यांनी शनिवारी आपल्या मूळ गावी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले होते. अशातच आज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीची बातमी समोर आली आहे. जरांगे पाटील यांची तब्बेत खालावली आहे. पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. (Maratha Reservation)

मात्र अशातच मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) शुक्रवारी सकाळी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील पाणी, अन्न घेणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मनातील संताप व्यक्त केला आहे.

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची मागणी काय आहे? :

मराठा समाजाचा ओबीसी (इतर मागासवर्गीय) गटात समावेश करण्याच्या मागणीसाठी ते एका वर्षात चौथ्यांदा उपोषण करत आहेत. जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी शनिवारी सांगितले होते की, “सरकारने दोन दिवसांत राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून रक्ताचे नातेवाईक याबाबत कायदा आणावा. ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी आहेत अशा 57 लाख लोकांना (ओबीसी) सरकारने जात प्रमाणपत्र द्यावे. (Manoj Jarange Patil)

अशातच मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला आहे. सर्व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या. तसेच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भडकले आहेत. त्यांचे आणि आमचे काहीही देणे-घेणे नाही. मराठे काय आहेत हे त्यांना कळेल असं मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) म्हणाले आहेत.

News Title : Maratha Reservation Manoj Jarange Patil

महत्वाच्या बातम्या –

हाडांची समस्या जाणवतेय? तर तुम्ही आता 8 दिवसांत होणार ठणठणीत

काय सांगता…आता CRPF परीक्षा मराठीत होणार! गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Today Horoscope l आजचे राशीविषय! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे

फायद्याची बातमी! शेतीच्या जोडव्यवसयांना मिळणार सरकारचे पाठबळ

क्रिकेटप्रेमींनो… उद्या होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल लढत; वाचा कुठे आणि किती वाजता होणार