फायद्याची बातमी! शेतीच्या जोडव्यवसयांना मिळणार सरकारचे पाठबळ

Income of farmers l देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुशंगाने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजना राबवताना केवळ राज्य सरकारच नाही तर केंद्राचाही पुढाकार महत्वाचा असतो. त्यामुळे केवळ शेती व्यवसयालाच नाही तर शेतीच्या जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केंद्र सरकार करत असते. (Income of farmers)

आपल्याला माहिती आहे कि भारतात शेतीशी संबंधित अनेक क्षेत्रे आहेत, तसेच भारतीय शेतकऱ्याकडे भरपूर क्षमता आहे आणि त्याचा फायदा घेऊन शेतकरी अधिक सक्षम होऊ शकतात. सध्याच्या घडीला यामुळेच सरकारकडून मत्स्यव्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाकडे (Income of farmers) विशेष लक्ष दिले जात आहे. सरकारच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय नागरिकांना पोषण आहारही मिळणार आहे. एवढेच नव्हे तर सरकारकडून मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील प्रगतीसाठी अतिरिक्त निधीही दिला जात आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतही 30 टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच आधुनिक डेअरी फार्ममधून मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची योजना राबवण्याचे सरकार प्लॅन करात आहे. (Income of farmers)

Income of farmers l देशातील 80 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न :

देशातील 80 कोटी शेतकरी हे अजूनही पशुपालनाशी संबंधित आहेत. आणि याचा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय या शेतकऱ्यांचे कामही सुखकर होणार आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत अर्थसंकल्पात 20 टक्के निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशी गायींची संख्या, उत्पादकता आणि दूध उत्पादन वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.पशूधनाच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम

Income of farmers l केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी बृहत आराखडा देखील तयार केला असल्याचे सांगण्यात येते. पशुधनाच्या आरोग्यासाठीही यंत्रणा उभारण्यात आली आहे. याच कारणामुळे पशुधन आरोग्य आणि रोगाच्या बजेटमध्ये 60 टक्के वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुधन वाचवणे, मोफत लसीकरणाची व्यवस्था करणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावरांमधील आजाराची ओळख करून देण्याची क्षमता विकसित करणे यासारखे प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत.

दोन्ही व्यवसयातील प्रगतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी :

देशातील मोठी लोकसंख्या पशुपालन आणि मत्स्यपालनाशी संबंधित आहे. आणि याच शेतकऱ्यांचा विकास झाला तर भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

News Title : Central Goverment New Idea Income of farmers

महत्वाच्या बातम्या – 

क्रिकेटप्रेमींनो… उद्या होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल लढत; वाचा कुठे आणि किती वाजता होणार

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली सामन्यांमधून बाहेर; पण का?

चाहत्यांनो… दोन मुलींसोबत ब्रेकअप केल्यानंतर मुनावर फारुकी पुन्हा प्रेमात पडला?

इन्स्टाग्रामच भन्नाट फीचर्स; AI च्या मदतीने मेसेज लिहता येणार

राज्य सरकारचं टेन्शन वाढणार! या कारणामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषण करणार