काय सांगता…आता CRPF परीक्षा मराठीत होणार! गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

CRPF Exam in Marathi Language l आजकाल कित्येक तरुणांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असत. तरुणवर्ग सरकारी नोकरीसाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. यामध्ये काही तरुण बँकेत, पोलीस दलात, मंत्रालयात तर काहींचं सीआरपीएफमध्ये नोकरी मिळवावी यासाठी ध्येयवेडे असतात. मात्र सीआरपीएफ नोकरी करण्यासाठी कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. (CRPF Exam)

13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर घेण्यात येणार :

अशातच आता सीआरपीएफची तयारी कर्णयनसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या म्हणजेच CRPF कॉन्स्टेबल दलाच्या परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या CRPF कॉन्स्टेबल पदाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गृहविभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता CRPF कॉन्स्टेबल परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर घेण्यात येणार आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे या परीक्षेत मराठी भाषेचाही समावेश आहे.

CRPF Exam in Marathi Language l सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जाणार आहेत. तसेच कॉन्स्टेबल जीडी परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (एसएससी) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. तयामुळे या परीक्षांमध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात.

सीआरपीएफ परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार देखील केला आहे. त्यामुळे कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 2024 मध्ये विविध भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CRPF Exam in Marathi Language l सीआरपीएफ परीक्षेंमध्ये या भाषांचा समावेश :

मराठी, आसामी, बंगाली, मल्याळम, कन्नड, तमीळ, गुजराती, तेलगू, उडिया, पंजाबी, मणिपुरी, कोकणी, उर्दू.

सीआरपीएफ भरतीबद्दल अगदी थोडक्यात माहिती (CRPF Exam in Marathi Language) :

या परीक्षेचा कालावधी काय असणार? : 20 फेब्रुवारी 2024 ते 7 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार.

CRPF Exam in Marathi Language l या परीक्षेला किती उमेदवार असणार? : जबळपास 48 लाख तरुण

या परीक्षेत किती सहभागी शहरे असणार? : 128

News Title : CRPF Exam in Marathi Language

महत्वाच्या बातम्या – 

Today Horoscope l आजचे राशीविषय! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे

फायद्याची बातमी! शेतीच्या जोडव्यवसयांना मिळणार सरकारचे पाठबळ

क्रिकेटप्रेमींनो… उद्या होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल लढत; वाचा कुठे आणि किती वाजता होणार

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली सामन्यांमधून बाहेर; पण का?

चाहत्यांनो… दोन मुलींसोबत ब्रेकअप केल्यानंतर मुनावर फारुकी पुन्हा प्रेमात पडला?