क्रिकेटप्रेमींनो… उद्या होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल लढत; वाचा कुठे आणि किती वाजता होणार

U19 World Cup 2024 Final Match l अंडर 19 विश्वचषक फायनल सामना उद्या म्हणजेच रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. अंडर-19 विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना हे माहित आहे का? हा सामना कधी, कुठे आणि केव्हा रंगणार आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

U19 World Cup 2024 Final Match l या चार खेळाडूंवर असणार संघाची जबाबदारी :

भारताने आतापर्यंत 5 वेळा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय टीम इंडियाने 8 वेळा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप फायनल खेळली आहे. म्हणजेच आतापर्यंत भारतीय संघाने 5 वेळा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक फायनल सामना जिंकला आहे. याशिवाय 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघ विक्रमी सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस, आणि सौमी पांडे या चार युवा खेळाडूंनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चार खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकण्याची सर्वाधिक जबाबदारी असेल. त्यामुळे भारतीय संघ सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

U19 World Cup 2024 Final Match l फायनलमधील टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी :

भारतीय संघ अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2018 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. यावेळी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कोणतीही चूक केली नाही. अशा प्रकारे भारत विक्रमी चौथ्यांदा चॅम्पियन बनला. तर टीम इंडियाने पाचव्यांदा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 जिंकले आहे. या टीम इंडियाचे नेतृत्व यश धुल करत होते. (U19 World Cup 2024 Final Match)

मात्र पुन्हा एकदा भारतीय संघ अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यावेळी टीम इंडियाची कमान उदय सहारन यांच्या हातात आहे. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर ते विक्रमी सहावे विजेतेपद ठरेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक सामन्याची A टू Z माहिती (U19 World Cup 2024 Final Match) :

या दोन संघांमध्ये होणार अंडर-19 विश्वचषक स्पर्धा :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

कधी रंगणार सामना :
रविवार, 11 फेब्रुवारी 2024

कुठे रंगणार हा सामना :
विलोमूर पार्क

किती वाजता होणार ही चुरशीची लढत :
भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता

News Title : U19 World Cup 2024 Final Match

महत्वाच्या बातम्या – 

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली सामन्यांमधून बाहेर; पण का?

चाहत्यांनो… दोन मुलींसोबत ब्रेकअप केल्यानंतर मुनावर फारुकी पुन्हा प्रेमात पडला?

इन्स्टाग्रामच भन्नाट फीचर्स; AI च्या मदतीने मेसेज लिहता येणार

राज्य सरकारचं टेन्शन वाढणार! या कारणामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषण करणार

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे राजकारणातील व्यक्तींवर विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील