Today Horoscope l आजचे राशीविषय! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे

Today Horoscope l मेष:- कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. कुटुंबात सहजता आणि मंगलता राहील.

वृषभ:- चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा. कठोर परिश्रम आणि व्यावसायिकतेसह कामाच्या ठिकाणी अनुकूलता राखेल.

मिथुन:- गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल. जवळच्या व्यक्तींच्या कामांवर लक्ष ठेवाल.

कर्क:- चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील. वैयक्तिक बाबींमध्ये भावनिकता दाखवू नका.

Today Horoscope l सिंह:- कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल.

कन्या:- धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल.

तूळ:- हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते.

वृश्चिक:- कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.

धनू:- अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल. चांगला आहार ठेवा. प्रतिभेवर आत्मविश्वास राहील. वैयक्तिक बाबींना गती मिळेल.

मकर:- मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी विशेष घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.

कुंभ:- बर्‍याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्‍याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.

Today Horoscope l मीन:- जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

महत्वाच्या बातम्या – 

फायद्याची बातमी! शेतीच्या जोडव्यवसयांना मिळणार सरकारचे पाठबळ

क्रिकेटप्रेमींनो… उद्या होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल लढत; वाचा कुठे आणि किती वाजता होणार

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली सामन्यांमधून बाहेर; पण का?

चाहत्यांनो… दोन मुलींसोबत ब्रेकअप केल्यानंतर मुनावर फारुकी पुन्हा प्रेमात पडला?

इन्स्टाग्रामच भन्नाट फीचर्स; AI च्या मदतीने मेसेज लिहता येणार