मोहम्मद शमीला मोठी दुखापत; थेट लंडनमध्ये होणार ऑपरेशन

Mohammed Shami Injury l टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीला एक मोठा धक्का बसला आहे. हा वेगवान गोलंदाज आता आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. मोहम्मद शमी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या संघाकडून खेळतो आणि गेल्या दोन मोसमात त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र आता मोहम्मद शमी (Mohammed Shami) पायाच्या दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमीच्या घोट्याला दुखापत झाली आहे. शमीला शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडला पाठवले जाऊ शकते. यामुळे मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Mohammed Shami Injury l गुजरात टायटन्सचे काय होणार? :

गेल्या वर्षीच्या आयपीएल पर्वात मोहम्मद शमीने गुजरात टायटन्सकडून (Gujrat Titans) सर्वाधिक बळी घेतले होते. गेल्या मोसमात या खेळाडूने 17 सामन्यात 28 बळी घेत संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. 2022 मध्ये या वेगवान गोलंदाजाने 20 विकेट घेत गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले होते. मात्र या मोसमात गुजरात टायटन्सला शमीची उणीव भासणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता हार्दिक पांड्याही त्यांच्यासोबत खेळणार नाही आणि अशातच आता शमी न खेळल्यामुळे त्यांना आणखी एका अनुभवी खेळाडूची उणीव भासणार आहे.

गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आता शमीच्या जागी आणखी काही वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करू इच्छित आहे. मात्र उमेश यादव, कार्तिक त्यागी आणि स्पेन्सर जॉन्सनसारखे वेगवान गोलंदाज गुजरात टायटन्सच्या संघात आहेत. पण तरीही शमीची कमतरता भरून काढणे अशक्य होईल.

Mohammed Shami Injury l T20 विश्वचषकही खेळणार नाही! :

मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकापर्यंतही तंदुरुस्त होणार नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांना मैदानात उतरणे कठीण असल्याचा दावा केला जात आहे. टीम इंडियाला ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. शमी वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंतच पुनरागमन करू शकेल.

News Title : Mohammed Shami Injury Dont Play IPL

 महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा झटका!; महिलेने जरांगेंवर केले गंभीर आरोप

‘बरासकरची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीये…’; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट!

WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा

रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; अभिनेत्रीचा लेहेंगा होतोय प्रचंड व्हायरल

राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी! माजी राज्यपालांच्या घरावर सीबीआयचे छापे