‘या’ तारखेला सर्वात मोठा रस्ता रोको करणार; जरांगेंनी घोषणा करत दिली सर्वात महत्त्वाची माहिती

Manoj Jarange | राज्यात मराठा आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी जरांगेंनी आंदोलनाला पूर्णविराम दिलेला नाहीये, या मागचं कारण म्हणजे जरांगेंनी ओबीसीमधून आरक्षणासाठी मागणी केली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणासह आंदोलन करत राहणार असा जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. दरम्यान, झालेल्या एक दिवसीय अधिवेशनात स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी मात्र, जरांगेंना ते मान्य नाही. त्यामुळे जरांगेनी काल घोषणा केली.

काय म्हणाले जरांगे?

आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाजासाठी आणि बांधवांसाठी लढत राहणार असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले होते. त्यामुळे जोवर आरक्षण नाही मिळणार तोवर आंदोलन आणि उपोषण सुरुच ठेवू असं देखील जरांगे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, 24 फेब्रवारीला गावागावात जाऊन रास्ता रोको करणार.

शिवाय 29 फेब्रवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे म्हणाले. तसेच 3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

दुपारचे लग्न संध्याकाळी करा-

बोलत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, 3 मार्च या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. या दिवशी दुपारी असणारी लग्न संध्याकाळी लावावी. कारण या दिवशी सर्वात मोठा रास्तो रोको आंदोलन निश्चित झाला आहे. त्यामुळे लग्न करणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारचे लग्न संध्याकाळी करा. लग्नास सर्व समाजातील लोक येत असतात. या दिवशी सर्व जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. या रास्ता रोको आंदोलनात नवरदेव नवरी सहभागी होतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

जरांगेंवर जिवलग मित्राचा गंभीर आरोप-

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कसलीही परवा न करत जरांगे आंदोलन करत आहेत. मात्र, कालपासून जरांगेंवर गंभीर आरोप होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. जरांगेंचा जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय बरासकार यांनी जरांगेवर आरोप केले आहेत.

News Title : manoj jarange reveals plan about maratha protest

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा झटका!; महिलेने जरांगेंवर केले गंभीर आरोप

‘बरासकरची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीये…’; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट!

WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा

रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; अभिनेत्रीचा लेहेंगा होतोय प्रचंड व्हायरल

राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी! माजी राज्यपालांच्या घरावर सीबीआयचे छापे